मतदारांची दुबार नावे वगळण्याची मागणी

मतदारांची दुबार नावे वगळण्याची मागणी

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

देवळाली विधानसभा मतदारसंघात Deolali assembly constituency असलेल्या 9016 मतदारांची दुबार नावे वगळण्याबाबत reduce of double names of voters माजी आमदार योगेश घोलप, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा निवडणूक आयुक्त स्वाती थविल District Election Commissioner Swati Thavil यांची भेट घेत निवेदन दिले.

शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बोगस व दुबार नोंदणी असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात यावी यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून ) देवळाली विधानसभा मतदार संघामध्ये काही नावे बोगस नोंदविण्यात आली असून 9 हजार 16 नावे दुबार असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार माजी आमदार योगेश घोलप, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक आयुक्त यांच्या नजरेस ही बाब आणून दिली. या दुबार नावामुळे ग्रामीण व मनपा क्षेत्रातील मतदारांवर त्याचा परिणाम होणार आहे.

या कारणांमुळे निवडणूक आयोगाची फसवणूक होत आहे. एका ठिकाणी असलेली नावे दुसर्‍या मतदारसंघातही असल्याने या प्रशासकीय चुका तातडीने दूर करण्यात याव्यात. मतदार याद्यांचे पुनसर्वेक्षण करून योग्य त्या याद्या तयार करण्यात याव्या.

Related Stories

No stories found.