शेतमालासाठी रेल्वे रॅकची मागणी

शेतमालासाठी रेल्वे रॅकची मागणी

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

कांद्याची बाजारपेठ Onion Market म्हणून लासलगावचा Lasalgaon नावलौकीक सर्वदूर आहे. परंतु येथे कांद्यासाठी रेल्वे विभागाकडून वेळेवर रेल्वे रॅक Railway Rack उपलब्ध होत नसल्यामुळे बदलत्या वातावरणामुळे चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत असल्याने लवकरात लवकर किसान रेलचे रॅक उपलब्ध करण्याची मागणी केली आहे

येथील रेल्वे स्थानकावर भुसावळ विभागाचे डिव्हिजनल डी आर एम. एस एस केडीया, सिनियर डीइएन राहूल अग्रवाल, डीसीएम अरुण कुमार, एडीइएन मनमाड विशाल डोळस, एसीएम मीना या रेल्वेचे अधिकार्‍यांनी भेट देत शेतकर्‍यांशी संवाद साधला.

शेतकर्‍यांचा शेतीमाल परराज्यात पोहोचण्यासाठी रेल्वेकडून अनुदानात किसान रेल सुरू करण्यात आली असून त्याचा फायदा शेतकर्‍यांना होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी विशाल पालवे, मनोज पाटील, नितीन कदम, रावसाहेब गांगुर्डे यांनी भुसावळ मंडल चे प्रबंधक एस.एस. केडिया यांच्याकडे मांडले.

किसान रेल योजनेअंतर्गत 30 मार्च ते 20 मे पर्यंत किसान रेलचे रॅक बुक करण्यात आले होते. मात्र अद्यापही किसान रेलचे रॅक उपलब्ध न झाल्याने कांद्यासह शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची कैफियत शेतकर्‍यांनी मांडली.

लासलगाव शहर विकास समिती तर्फे कोविड काळात बंद असलेली गाडी मनमाड-गोदवरी एक्सप्रेस, मनमाड-इगतपुरी शटल, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, कामायणी एक्सप्रेस सुरू करावी. तसेच गोदावरी एक्स्प्रेसने मनमाड, लासलगाव निफाडहून अनेक चाकरमानी प्रवास करत असतात. त्यांच्या करिता गोदावरी एक्सप्रेस सुरू होऊन एम.एस.टी. पास ची सुविधा द्यावी.

तसेच कोच पोझिशन लावण्यात यावे अशी मागणी राजेंद्र कराड, संदीप उगले, मयूर झांबरे, दत्ता कुमावत, चंद्रकांत नेटारे, मंगेश रोटे, नीरज श्रीवास्तव, भगवान बोराडे यांचेसह लासलगाव, विंचूर, निफाड, चांदवड, सायखेडा येथील कांदा, फळे, भाजीपाला व्यापारी व परिसरातील असंख्य शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com