सिन्नर । Sinnar (प्रतिनिधी)

लॉन्स, मंगल कार्यालय, केटरिंग व्यवसाय, मंडप डेकोरेटर्स आदी व्यवसाय वर्षभरापासून अडचणीत आले आहेत. व्यावसायिकांची व त्यांच्याकडील कामगारांची आर्थिक स्थिती खालावली आहे.

इतर व्यवसायांप्रमाणे लॉन्स, मंगल कार्यालय यांना क्षमतेच्या 50 टक्के इतकी परवानगी मिळावी, अशी मागणी लॉन्स, मंगल कार्यालय असोसिएशन, केटरिंग असोसिएशन, मंडप डेकोरेटर्स असोसिएशन यांनी केली आहे. मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांना देण्यात आले.

मनोज भगत यांच्यासह तीनही संघटनांचे पदाधिकारी व्यवसायिक यांनी मागणीचे निवेदन दिले. करोना संसर्ग टाळण्यासाठी वर्षभरापासून व्यवसायांवर निर्बंध आले आहेत. उदरनिर्वाह संपूर्णपणे व्यवसायावर अवलंबून आहे.

कामास असलेल्या कर्मचार्यांचे कुटुंबही त्यावरच अवलंबून आहे. वर्षभरापासून हे व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आहेत. लॉन्स, मंगल कार्यालयाच्या क्षमतेच्या 50 टक्के इतकी परवानगी देऊन व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

सरकारने हॉटेल, जिम, नाट्यगृह, सिनेमा हॉल, पब्लिक ट्रान्सपोर्ट आदी व्यवसायांना क्षमतेच्या 50 टक्के इतकी परवानगी देऊन व्यवसाय सुरू ठेवले आहेत. त्याचप्रमाणे लॉन्स, मंगल कार्यालयांना क्षमतेच्या 50 टक्के इतकी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या व्यवसायांवर अवलंबून अनेक व्यवसाय आहेत. हे व्यवसायही अडचणीत आले आहेत. परवानगी मिळाल्यास आर्थिक बिकट परिस्थितीतून व्यावसायिक सावरू शकतील. त्यामुळे परवानगी देण्याची मागणी पदाधिकार्यांनी केली.