पुनदखोरे । वार्ताहर

कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत कंत्राटी सेवकांना पुनर्नियुक्ती आदेश तसेच मागील थकित वेतन मिळण्याबाबत कला, क्रीडा, संगणक शिक्षक सेवंकाच्या वतीने प्रकल्प अधिकारी विकास मीना यांना निवेदन देण्यात आले.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील आश्रमशाळा बंद करण्यात आल्या होत्या. आदिवासी विकास विभागातील कंत्राटी कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांचे 2019-2020 ते करोना काळातील आठ महिन्यांपासूनचे वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे कंत्राटी शिक्षक व सेवकांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

मागील आठ महिन्यांपासून विनावेतन जीवन जगत असलेल्या कंत्राटी शिक्षकांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने मागील वेतन व पुनर्नियुक्तीचे आदेश द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कंत्राटी सेवकांना मागील थकित वेतन मिळालेले नाही. कंत्राटी सेवकांचे वेतन अथवा मानधन रोखले जाऊ नये, कामावरून काढून टाकू नये, असे शासनाचे आदेश आहेत.

कंत्राटी सेवकांंना तत्काळ मागील वेतन मिळावे, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रकल्प अधिकारी विकास मीना यांच्याकडे केली आहे. यावेळी राहुल कापडे, तुषार पगार, सचिन जगदाळे, पंकज वडगे, धीरज शिल्लक, रोशन शेळके, भूषण सूर्यवंशी, रमेश सोनवणे, अमित शेवाळे, निखिल भारती आदी उपस्थित होते.