पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

निफाड। प्रतिनिधी Niphad

तालुक्यात दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या पावसाचे Heavy Rain दुष्परिणाम आता दिसू लागले आहे. साहजिकच अद्यापही शेतात पाणी कायम असून कांदा रोपासह टोमॅटो, मका, सोयाबीन, द्राक्षबागांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावाजवळून वाहणार्‍या नद्या, नाल्यांचे पाणी घरात शिरून अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. अवघा शिवार जलमय झाल्याने शेतकर्‍यांनी महागडी बियाणे, खते, औषधे वापरून उभी केलेली व आता हातात आलेली पीके पुर्ण वाया गेली आहे. तालुक्यात जवळपास 2 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या नुकसानीची तत्पर पाहणी करून पंचनामे panchnama of crop loss होणे गरजेचे आहे.

दोन महिने वाट पहावयास लावणार्‍या पावसाने या आठवड्याच्या प्रारंभीच धुव्वाधार हजेरी लावत संपूर्ण शिवार आपल्या कवेत घेतला. तालुक्याच्या पुर्व भागातील गोंदेगाव, भरवस, वाहेगावला जोडणार्‍या रस्त्यावरील भरवस फाट्याजवळचा पुल पाण्यामुळे वाहून गेला तर गोंदेगाव जवळच्या नाल्याला प्रथमच मोठा पुर आल्याने नाल्यापलिकडील वाडीवस्त्याचा अद्यापही गावांशी संपर्क होवू शकलेला नाही.

विंचूर जवळचा बंधारा फुटल्याने 15 कुटुंबाचे संसार वाहून गेले. तालुक्याच्या उत्तर पट्टयात टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सोमवार व मंगळवारच्या पावसामुळे टोमॅटोची पाने गळून पडली. साहजिकच शेतातील उभी झाडे सडू लागली आहेत. प्रारंभी टोमॅटोला भाव नाही तर आता बाजारभावात सुधारणा होत असतांनाच पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. मका, सोयाबीन सारखी पीके देखील या पावसाच्या तडाख्यातून वाचू शकली नाही. कोळगाव-कानळद परिसरात पावसाचे पाणी जमा झाल्याने या परिसरातील पीके पाण्याखाली गेली.

शेतातील पाणी काढण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने अती पाण्यामुळे मका, सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला ही पीके सडू लागली आहेत. या परिसरातील चर काढण्याचा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. त्याचा फटका या परिसरातील शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. शिवरे, गाजरवाडी, नांदूरमध्यमेश्वर, गोदाकाठ परिसरातील द्राक्षबागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने औषध फवारणीस अडचणी येत आहेत.

साहजिकच यावर्षीच्या द्राक्षबागांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी दसरा, दिवाळी सण विचारात घेवून अनेक शेतकर्‍यांनी झेंडूची लागवड केली होती. मात्र या पावसाने झेंडू शेतीला देखील दणका दिला. लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालय परिसराला पाण्याचा वेढा पडल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे हाल झाले. बाजारपेठांमध्ये पाणी शिरून शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शिवार रस्त्यांची लागली वाट

पावसामुळे शिवार रस्त्यांवर चिखलांचे साम्राज्य तयार झाल्याने पायी चालणे देखील अवघड होत आहे. साहजिक शेतमाल काढणीला अडचणी येत आहे. शिवार रस्त्याप्रमाणेच गावांना जोडणार्‍या व बाजारपेठांना जोडणार्‍या रस्त्याची देखील चाळण झाली असून वाढते खड्डे प्रवासासाठी डोकेदुखी ठरत आहेत. गेले दोन महिने कोरडेठाक असणारे नदी, नाले, पाझर तलाव तुडूंब भरून वाहू लागले असून पाणीटंचाईची समस्या मिटली असली तरी शेतात उभी असलेली व हातात आलेली पीके या पावसामुळे वाया गेली आहे.

पावसामुळे जुनाट घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शेतात साचलेले पाणी काढण्याची कुठलीही सोय नसल्याने द्राक्षबागांसह शेतीमशागतीची सर्व कामे थंडावली असून अति पाण्यामुळे खरिपाचा पुर्ण हंगाम वाया गेला आहे. शेतकर्‍यांनी महागडी खते, बियाणे, किटकनाशके वापरून व चार महिने मेहनत करीत पीके उभी केली. आता ही पीके काढणीला येण्याची वेळ अन् अवकाळीची एकच वेळ झाली. परिणामी या पिकांसाठीची मेहनत वाया गेली आहे. शासन स्तरावरून या पीक नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.