पंचायत समिती सदस्यांना एक वर्षाची मुदतवाढ द्या!

पंचायत समिती सदस्यांना एक वर्षाची मुदतवाढ द्या!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गट व गणांचे आरक्षण किमान दहा वर्षे कायम ठेवावी,तसेच विद्यमान जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती सदस्यांना (Panchayat Samiti Members) एक वर्षाची मुदतवाढ मिळावी,अशी मागणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी स्थापन केलेल्या संघटनेने केली आहे.यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि.23) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या नावाने अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले....

जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती (Panchayat Samiti) सदस्य असोसिएशनच्या महिला प्रदेशाध्यक्ष अमृता पवार (Amruta Pawar), जिल्हाध्यक्ष डॉ.आत्माराम कुंभार्डे (Dr Atmaram Kumbharde) यांच्यानेतृत्वाखाली सर्वपक्षीय सदस्यांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्यच असायला हवा, जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांचे फिरते राजकीय आरक्षण हे किमान 10 वर्षांसाठी कायम असायला हवे,

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये मनोमित (कॉप्ट) सदस्यांची नियुक्ती करावी, 73 व 74 वी घटनादुरुस्ती राज्यात लागू करावी, सेवकांवर नियंत्रणासाठी सी.आर.चे अधिकार असावे, पंचात समिती सदस्यांना विधान परिषदेसाठी मतदानाचा अधिकार असावा, जिल्हा परिषद सदस्यांना 20 तर पंचायत समिती सदस्यांना 10 हजार रुपये मानधन मिळावे, विद्यमान सदस्यांना एक वर्ष मुदतवाढ देण्याची मागणीही संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे मुख्य संघटक दिनकर पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष निवृत्ती (गोरख) बोडके, प्रवक्ते यशवंत शिरसाठ, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष मोतिराम दिवे, उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष रुपांजली माळेकर, समाधान हिरे, सुरेश कमानकर, पुष्पा धाकराव, कविता धाकराव, नितीन आहेर, रत्नाकर चुंभळे, महेंद्रकुमार काले, भास्कर भगरे, शिवाजी सुरासे, संजय शेवाळे, राजेश पाटील, शंकरराव संगमनेरे, अंबादास आहेर, माधव बनकर, प्रवीण गायकवाड, अरुण पाटील, विनायक माळेकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com