अहो साहेब! काहीतरी करा एमएचटी सीईटी पुढे ढकला; विद्यार्थ्यांचा टिवटीवाट

अहो साहेब! काहीतरी करा एमएचटी सीईटी पुढे ढकला; विद्यार्थ्यांचा टिवटीवाट

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जेईई मेन (JEE Main), एमएचटी-सीईटी (MHT CET) व जेईई ॲडव्हान्स (JEE Advance) या तिन्ही परीक्षा लागोपाठ येत असल्याने एमएचटी सीईटी (MHT CET) पुढे ढकलण्याची मागणी काही विद्यार्थ्यांमधून होत आहे. बारावी उत्तीर्ण (12th Pass Students) झालेल्या आणि ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे ट्विटरद्वारे ही विनंती केली आहे....

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत ( Higher Education Minister Uday Samant )यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये इंजिनीअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली होती.

ही परीक्षा ४ ते १० सप्टेंबर आणि १४ ते २० सप्टेंबर अशा दोन सत्रांत होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यापूर्वी 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (National Testing Agency) मार्फत मे महिन्यातील पुढे ढकललेल्या जेईई मेन (JEE Main) परीक्षेसाठी २ सप्टेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली होती.

जेईई ॲडव्हान्स (JEE Advance) ही परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार असल्याचे 'एनटीए' (NTA) मार्फत सांगण्यात आले आहे. या तिन्ही परीक्षा देणारे विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत. या परीक्षा लागोपाठ आल्याने तारीख बदलाची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com