झेंडू, शेवंती फुलांना मागणी

मोठी आवक, लाखोंची उलाढाल, पूजा साहित्याची खरेदी
झेंडू, शेवंती फुलांना मागणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहर परिसरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह Diwali Festival पाहावयास मिळत आहे. बाजारपेठा ग्राहकांनी गजबजून गेल्या आहे. आज दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसापैकी लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. बाजारातील गर्दी पाहता करोनाचा मागमूसही कोठेही आढळत नाही. लक्ष्मीपूजन आणि झेंडूंच्या फुलांंची marigold सजावट हे समीकरण असल्याने काल पूर्वसंध्येला झेंंडुंच्या फुलांच्या खरेदी-विक्रीत लाखो रुपयांची उलाढाल झाली.

झेंडू व शेवंतीच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने शहरातील फूलबाजार, गोदाकाठ, रविवार कांरंजा, टिळक पथ, नाशिकरोडचा बिटको चौक, नवीन नाशिकमधील शिवाजी चौक, त्रिमूर्ती चौक,पाथर्डीफाटा, गंंगापुर नाका, इंदारानगर, सातपुर या ठिकाणी झेंडूच्या खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी झाली. यंदा मोठ्या प्रमाणात बाजारात झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली.

सुरवातील दीडशे रुपये कॅरेटचा भाव होता. शंभर रुपये शेकडा गेंंदेदार फुल विकले जात होते. शेवंतीची फुलेही 50 व 80 रुपये किलोने अनेकानी विकत घेतली. दुपारनंतर जसजशी फुलांची आवक वाढत गेली तसतसा भावही खाली वर होत होता. मात्र रात्री उशीरा पर्यंंत दर्जेदार फुलांना मागणी कायम असल्याने भाव टिकून होते. व्यापारी वर्ग लक्ष्मी पुजन करतांना शक्यतो खर्च करतांना हात आखडता घेत नसल्याने फुल विक्रेत्यांच्या हाती चांगला पैसा खेळला.

झेंडूच्या फुलांसोबतच आंब्याची डाहाळे, साळीच्या लाह्या, बत्ताशे, पाच फळे, लक्ष्मीची मूर्ती, फोटो तसेच वह्यां व पूजा साहित्य, शेवंतीची वेणी, विक्रेत्यांची आज दिवसभर धमाल दिसली. सकाळपासून विक्रेते सज्ज झाले होते. मूर्ती 70 रुपयात, लक्ष्मीचा फोटो 20 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत होता. वह्या 35 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंंत तर पाच फळे तीस रुपयांना विकले गेले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com