कर्जबाजारी शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी

प्रहार जनशक्ती पक्ष
कर्जबाजारी शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या Prahar Janashakti Party पदाधिकार्‍यांकडून राज्यमंत्री बच्चू कडू Minister of State Bachchu Kadu यांची भेट घेऊन तालुक्यातील कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या व्यथा मांडत त्यांना न्याय देण्याची मागणी केली.

तालुक्यातील अनेक शेतकरी विविध पतसंस्था व बँकेच्या कर्ज प्रकरणाचे बळी ठरलेले आहे. बँकेच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या नावावर बेकायदेशीरपणे कर्ज उचलल्याचा प्रहारच्या पदाधिकार्‍याचा आरोप आहे.

बँकाचे वसूली अधिकारी शेतकर्‍यांना कर्ज वसूलीसाठी तगादा लावत असून त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे निवदेनात म्हटले आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची मागणी प्रहारच्या पदाधिकार्‍यांनी ना. कडू यांच्याकडे केली.

यावेळी ना. कडू यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे collector Suraj Mandhare यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करुन सिन्नरच्या कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या जप्ती विषयी चर्चा केली.

मांढरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष शरद शिंदे, शहराध्यक्ष दौलत धनगर, युवाध्यक्ष संदीप लोंढे, उपाध्यक्ष सुनील महाराज, शेतकरी शिवाजी गुंजाळ, सुरेश सानप, पंकज पेटारे, भास्कर उगले, अर्जुन घोरपडे, कैलास खैरनार, गणेश सानप उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com