फलक लागले; गतिरोधकांना मुहूर्त काही मिळेना

फलक लागले; गतिरोधकांना मुहूर्त काही मिळेना

टाकेद | Taked

घोटी सिन्नर मार्गावरील (ghoti-sinnar road) अत्यंत वर्दळीचे म्हणून पिंपळगाव मोर (pimpalgaon mor) ओळखले जाते. पिंपळगाव मोरहून एक रस्ता सिन्नर-शिर्डीकडे तर एक रस्ता भंडारदरा-राजूरकडे जातो. सिन्नर-वैजापूर औद्योगिक वसाहतींचा कच्चा माल घेऊन अनेक वाहने येथून जातात...

वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या रस्त्यांसाठी गावाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक (speed breaker) असावे, अशी मागणी नागरिक अनेक दिवसांपासून करत आहेत. गेल्या महिनाभरापासून पिंपळगाव मोरच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाचे फलक लागले आहेत.

परंतु या ठिकाणी गतिरोधक टाकण्याचा मुहूर्त बांधकाम विभागाला अद्यापही सापडला नाही की काय? असा सवाल नागरिक करत आहेत.

समृद्धी महामार्गावरील (samruddhi highway) गाड्यांची वर्दळ व दैनंदिन वाहतुकीने नागरिक त्रस्त झाले असून या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक टाकावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

Related Stories

No stories found.