स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची चौकशी करा

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची चौकशी करा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्मार्ट सिटीअंतर्गत (Smart City) सुरू असलेल्या रस्त्यांच्या खोदकामामुळे ड्रेनेज व पाणीपुरवठा पाईपलाईन (Drainage and water supply pipelines) फुटल्या आहेत. पाण्याच्या व ड्रिनेजच्या लाईनचे नुतनीकरण करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करत रस्त्याचे सपाटीकरण सुरू करण्यात आले आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते व माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल (Rajendra Bagul) यांनी केला...

बागुल यांनी शहराच्या विविध भागात फिरून प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी त्यांनी नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) निदर्शनास आणून दिल्या आहेत. याबाबत त्यांनी महानगरपालिकेला निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पाण्याचा अपव्यय, ड्रेनेजची दुर्गंधी यातून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी कमी दाबाने व काही भागात पाणीच दोन-दोन महिने येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. तसेच महानगरपालिकेला अतिरिक्त खर्चाचा भार पडत असून नागरिकांच्या पैशांचा अनाठायी खर्च होत आहे.

पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकाम विभाग यांचा समन्वय नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे, याकडे मनपा आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav) यांनी स्वत: लक्ष घालून या कामांची चौकशी करावी, अशी मागणी बागुल यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.