परस्पर खत विक्रीच्या चौकशीची मागणी

परस्पर खत विक्रीच्या चौकशीची मागणी
USER

ममदापुर | वार्ताहर

तालुक्यातील मौजे ममदांपुर संवर्धन फॅारेस्ट येथील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या लेंडी खत हे वन विभागाने गावातील काही लोकांना हाताशी धरून अनधिकृतरित्या विकले आहे. अशी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. सदर घटनेची चौकशी करून तातडीने खुलासा करावा, अशी मागणी ममदापूर ग्रामपंचायतचे वतीने प्रांाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,आपल्या विभागाने कोणतीही रीतसर कार्यवाही न करता सरपंच, ग्रामपंचायत, वन कमिटी व वन कमिटीचे अध्यक्ष यांना कोणतीही माहिती न देता शासकीय जागेवरील मालमतेचा लिलाव न करता ती परस्पर विकुन टाकण्यात आल्याने गावातील ग्रामस्थांनी या बाबत चौकशी होण्यासाठी विनंती केली आहे.

तशी चर्चा दि. २८ मे राजी च्या सभेत झाली आहे. त्याप्रमाणे आपल्या स्थरावरुन याबाबतची चौकशी होऊन तसा अहवाल ग्रामपंचायतमध्ये सादर करावा व योग्य ती कारवाई करावी कारवाई न झाल्यास ममदापूर सरपंच, उपसरपंच व सदस्य आपल्या वनविभागाच्या हद्दीत सोमवारी दि. १४ जून रोजी सकाळी ११, वा. उपोषणास बसतील.

यावर होणार्‍या पारिणामास आपले कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी हे जबाबदार असतील याची नोंद घ्यावी. तरी लवकरात लवकर कार्यवाही करून लेखी खुलासा करावा असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाचा प्रती तहसिलदार, वनविभाग, तालुका पोलिस ठाणे आदींना देण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायत ममदापूर मासिक सभा दि. २८ मे रोजीच्या ठराव अन्वय ममदापुर संवर्धन फॉरेस्ट मध्ये दि. २५ मे रोजी वनपाल व वनरक्षक काही ग्रामरस्थ यांनी समक्ष खत वाहुन नेल्याच्या जागेचा पंचनामा केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com