सुरगाणा तालुक्यात लसींचा पुरवठा वाढवा

माजी सभापती भोयेंची आरोग्यमंत्रांकडे मागणी
सुरगाणा तालुक्यात लसींचा पुरवठा वाढवा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चार महिन्यात सुरगाणा तालुक्यातील (Surgana taluka) शंभरच्या आसपास गावांमध्ये जाऊन १० हजार लोकांशी प्रत्यक्ष व ६० हजार लोकांशी सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून संपर्क साधत लसीकरण (Corona vaccination) जनजागृती करण्यात आली आहे...

यामुळे सुरगाणा तालुक्यात अपेक्षित असलेले परिणाम दिसायला लागले आहेत. त्यामुळे तालुक्यात लसींचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्याकडे सुरगाणा पंचायत समितीच्या माजी सभापती मंदाकिनी भोये (Mandakini Bhoye) यांनी केली आहे.

सुरुवातीला तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण खूप कमी होते. साहजिकच सुरगाणा तालुक्याकडून लसीचा कमी साठा उचलला जात होता. सुरगाणा तालुक्यातील लसींचा कोटा इतर तालुक्यांना दिला जात होता.

परंतु, आता तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण वाढल्यामुळे आपल्या वाट्याला आलेला लसींचा कोटा कमी पडत आहे. तरी मागच्या काळात कमी घेतलेला लसींचा कोटा आत्ता आम्हास मिळायला हवा. अशी मागणी भोये यांनी केली आहे.

याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुरगाणा तालुक्यात लसीचा पुरवठा वाढवण्याची विनंती करण्यात आली आहे. टोपे यांनी याबाबत तात्काळ संबंधित विभागाला कळवणार असल्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती माजी सभापती मंदाकिनी भोये यांनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com