लसींचा पुरवठा वाढविण्याची मागणी

लसींचा पुरवठा वाढविण्याची मागणी

निफाड । प्रतिनिधी Niphad

सायखेडा ही गोदाकाठची प्रमुख व्यापारी बाजारपेठ असून येथे दररोजचा 20 ते 25 गावांतील नागरिकांचा संपर्क असतो. एकट्या सायखेडा गावची लोकसंख्या 11 हजारांच्या आसपास असून येथे लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे येथे 18 ते 45 वर्षांपुढील नागरिकांसाठी येथील उपकेंद्रात लस उपलब्ध व्हावी, अशी मागणी सायखेडा ग्रा.पं. सदस्य अशपाक शेख यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी नवलसिंग चव्हाण यांच्याकडे केली आहे.

सायखेडा परिसरातील नागरिकांना करोना लस घेण्यासाठी चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. अनेक वेळा तासन्तास थांबूनही तेथे लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे येथील नागरिकांचा वेळ व पैसा वाया जातो. अनेक नागरिक भाडोत्री वाहने करून लसीकरणासाठी जातात. त्यामुळे सायखेडा उपकेंद्रात 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

कारण लसीकरणासाठी जाणारे वयोवृद्ध नागरिक तसेच रुग्ण यांना लसीकरणासाठी मोठी धावपळ करावी लागते. अनेकवेळा प्रवासात छोटे-मोठे अपघातदेखील घडतात. फुकटची लस मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील उपकेंद्रात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देऊन लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com