शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

ओझे । वार्ताहर (ozhe)

राज्यभरातील हजारो शिक्षकांना (teachers) जुनी पेन्शन योजना (Old pension scheme) लागू करण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jirwal) यांना दिंडोरी तालुक्यातील (dondori taluka) माध्यमिक शिक्षकांच्या (Secondary teachers) वतीने निवेदन (memorandam) देण्यात आले. आगामी अधिवेशनात (Convention) जुनी पेन्शन योजने बाबतचा प्रश्न मार्गी लावण्यास साकडे घालण्यात आले.

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर शासनाने शंभर टक्के अनुदान दिलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना (Old pension scheme) लागू करण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन देण्यात आले. नवीन योजनेचा लाभ हानीकारक असून एवढ्या विलंबाने यांना डीसीपीएस योजना (DCPS plan) लागू केल्यास सेवानिवृत्तीनंतर (Retirement) त्यांना खूपच कमी प्रमाणात लाभ मिळतील काही कर्मचारी यांना तर लाभ मिळणार नाहीत .

म्हणून या कर्मचार्‍यांनी अनेक वर्ष र्विनाअनुदान तत्त्वावर केलेल्या सेवेचा सहानुभूती पूर्वक विचार करून त्यांना एक नोव्हेंबर 2005 पूर्वी ची जुनी पेन्शन योजना लागू करावी असे निवेदनात म्हटले आहे राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दि. 23 डिसेंबर 2021 पासून विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आजाद मैदान मुंबई येथे बेमुदत महा विश्वास धरणे आंदोलनास बसणार आहेत . यावेळी दिंडोरी तालुक्यातील माध्यमिक शिक्षक सुरेश मोरे, विनोद खैरनार ,गिरीधर वाघ, सोमनाथ शेवाळे हे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com