अवकाळीने हार्वेस्टरला मागणी; गहू सोंगणीसाठी एकरी 'इतक्या' रुपयांची दरवाढ

अवकाळीने हार्वेस्टरला मागणी; गहू सोंगणीसाठी एकरी 'इतक्या' रुपयांची दरवाढ

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात काल आणि आज अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह (Stormy winds) पावसाने (rain) अचानक हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या (farmers) उभ्या गहू, मका, हरभरा, द्राक्ष आदी पिकांचे प्रचंड नुकसान (crop damage) झाले.

शेतकर्‍यांच्या तोंडचा घास अवकाळीने हिरावला आहे. सोंगणीला आलेला गहू अवकाळीच्या तडाख्यात सापडू नये, म्हणून शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांना काल हार्वेस्टरला (harvester) पसंती दिली. अचानक मागणी वाढल्याने हार्वेस्टर चालक- मालकांंनी संधी साधत एकरी सुमारे 500 रुपये दरवाढ (price increase) करून अवकाळीत सुगीचा लाभ घेतला. त्यामुळे शेतकर्‍यांना जादा दर मोजत गहू सोंगणीत आर्थिक दरवाढीची झळ सोसावी लागली

शनिवार, रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण (Cloudy weather) होते. काही भागात काल सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने गहु उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली. सोंगणीसाठी धावपळ उडाली. काहींचा काढून झालेला गहू, मका, हभरा, सोयाबीन, कांदा झाकण्यासाठी तारांबळ झाली. तर काहींची शेतात उभा असलेला गहू काढण्यासाठी पंजाब (panhab) आणि हरियाणा (Haryana) येथून सोग्रस, शिरसाणे आदी परिसरात आलेल्या हार्वेस्टर मालकांच्या मागे फिरण्यात दिवस वाया गेला.

त्यामुळे आठ दिवसांपूर्वी हार्वेस्टरचालक परिसरात फिरून काढणीस आलेल्या गहू मालकांना स्वत: संपर्क करून एकरी 2 हजार रुपये दराने गहू सोंगून देत होते. मात्र काल अचानक दिवसभर शेतकर्‍यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) धाक बसल्याने पावसाअगोदर गहू काढण्यासाठी हार्वेस्टर आपल्याच मिळावे म्हणून त्यांच्या विनवण्या कराव्या लागल्या. त्यामुळे ही संधी साधून त्यांनी एकरी सुमारे 500 रुपये दर वाढवून उखळ पांढरे करून घेतले.

हार्वेस्टर मालकांनी शेजारी शेजारी असलेला गहू काढणीस प्राधान्य दिल्यामुळे काही शेतकर्‍यांचा काल दिवभरात गहू काढणीस नरंबच लागू शकला नाही. परिणामी संध्याकाळी आलेल्या पावसाने काहींचा गहू शेतातच भिजल्यामुळे शेतकर्‍याच्या डोळ्यात अश्रू आले होते. कांदा, द्राक्ष, भाजीपाला पिकांचे नुकसान डोळ्यादेखत पाहिलेल्या शेतकर्‍यांची व्यथा लक्षात घेऊन गहू उत्पादक शेतकर्‍यांनी नुकसान टाळण्यासाठी आणि मनुष्यबळावर मात करण्यासाठी कमी वेळेत लवकर गहू सोंगून देणार्‍या हार्वेस्टर या यंत्राला चांगली पसंती दिल्याने हार्वेस्टर चालकांचे फावले गेले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com