आर्थिक भरपाईसह शासकीय सेवेत घेण्याची मागणी
नाशिक

आर्थिक भरपाईसह शासकीय सेवेत घेण्याची मागणी

विद्युत खांब अंगावर पडून तरुणाचा मृत्यु; तहसीलदार व वीजमंडळास निवेदन

Abhay Puntambekar

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

सुरगाणा- तालुक्यातील सर्व आदिवासी संघटना तसेच माणी येथील ग्रामस्थांकडून निवेदनांद्वारे- माणी ता.सुरगाणा येथील कमवत्या तरुणाचा विजेचा खांब पडून शॉकने झालेल्या मृत्यूप्रकरणी कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे.सोबतच तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी तहसीलदार व वीज मंडळाकडे करण्यात आली.

दि.12/08/2020 रोजी माणी ता.सुरगाणा येथील घटनेत आपल्या कामासाठी जाणाऱ्या आपल्या बांधवावर कोणावरही न येवो,अशी वेळ आली यात विज महामंडळाच्या हलगर्जी पणामुळे काही ध्यानीमनी नसतांना अचानक विद्युत खांब पडून तारा पडल्याने शॉक लागून -विजय रमेश कहांडोळे हा कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला .

तोच कुटुंबाचा आधार होता.या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबाचे भविष्यात न भरुन निघणारे .मोठे नुकसान झाले आहे.याला संपूर्णपणे जबाबदार विज महामंडळच आहे व त्यांचा हलगर्जीपणाच आहे. याप्रकरणी आतापर्यंत चौकशी करून विजमंडळ आर्थिक मदत करतीलही परंतू,एका कुटुंबाचा कमवता आधारच गेल्याने.नुकसानीचे व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकिय सेवेत घेण्यात यावे ही ठाम मागणी करण्यात आली.

त्यासोबतच त्वरीत शासकिय मदत करावी.तसेच महामंडळावर कारवाई करावी,अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला.यावेळी तालुक्यातील समाजबांधव,माणी ग्रामस्त,आदिवासी बचावसह सर्व संघटना प्रतिनिधीसह यांनी केली यावेळी .एन.एस.चौधरी, परशराम पाडवी,ॲड.निलेश जाधव,.रमेश थोरात,अशोक भोये,गणेश वाघमारे,संजय मसरामसर,मनोहर ठाकरे,परशराम बिरारी,मोहन चौधरी आदी.उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com