गिसाका ताब्यात देण्याची मागणी; सभासदांचा उपोषणाचा इशारा

गिसाका ताब्यात देण्याची मागणी; सभासदांचा उपोषणाचा इशारा

दाभाडी । वार्ताहर | Dabhadi

सक्त वसुली संचालनायाने (ईडी) (ED) जप्त केलेला गिरणा साखर कारखाना (Girna sugar factory) शेतकरी (farmers) सभासदांच्या ताब्यात द्यावा अन्यथा कारखान्याचे सभासद (member) मुंबई (mumbai) येथील ईडी कार्यालयासमोर (ED Office) बेमुदत उपोषण (Indefinite hunger strike) सुरु करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत येथील वाणी मंगल कार्यालयात महाराष्ट्र सहकार बचाव अभियानाचे अध्यक्ष यशवंत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. सुगन बरंठ म्हणाले की, सन 2016 मध्ये गिरणा साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली त्याचवेळी ही मालमत्ता शेतकरी सभासदांच्या ताब्यात मिळावी; अशी मागणी केली होती.

पंरतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आजच्या बैठकीत पुन्हा ईडीने कारखाना सभासदांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत ईडी कार्यालयास (ED Office) निवेदन (memorandum) देऊन निर्णयासाठी एक महिन्याची मुदत देण्यात यावी. त्यानंतरही ईडीने निर्णय न घेतल्यास कारखान्याचे सभासद, शेतकरी, कामगार ईडीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी यशवंत अहिरे यांनी गेल्या दोन वर्षातील कामाचा आढावा सादर केला. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सभासदांचे रिट पिटीशन नंबर 27609/2013 दाखल असून त्याची लवकर सुनावणी घ्यावी, अशी मागणी सभासद, शेतकर्‍यांनी करावी, असेही बैठकित ठरविण्यात आले. संजय जोशी, सुरेश पवार, शिवाजी पाटील यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस वसंत निकम, रतन आनंदा सोनवणे, विष्णू जोशी,

शांतीलाल बुरूड, शेखर पवार, अरुण अहिरे, अंताजी निकम, जामराव निकम, किशोर निकम, संजय गिरासे, दगा कदम, संजय अहिरे, बाळकृष्ण धांडें, अशोक अहिरे, उत्तम निकम, हरिभाऊ निकम, केदा पवार, निंबा अहिरे, विशाल निकम, सुरेश ठाकरे, विश्वास निकम, विजय निकम, राजेंद्र पगार आदिंसह बहुसंख्य सभासद, शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com