चौकशी स्थगितीविरोधात याचिका दाखल करण्याची मागणी

चौकशी स्थगितीविरोधात याचिका दाखल करण्याची मागणी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

चौकशी अहवालात संचालकांवर ठपका ठेवत आर्थिक नुकसान (Financial loss) झाल्याचे म्हटले असून देखील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Co-operative Bank) आजी-माजी संचालक, अधिकारी यांच्या कलम 88 अन्वये झालेल्या चौकशीला (Inquiry) सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil) यांनी स्थगिती दिली आहे.

या स्थगिती विरोधात जिल्हा बँक प्रशासनाने तात्काळ न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी मागणी जिल्हा बँकेच्या सभासदांच्या शिष्टमंडळाने जिल्हा बँक प्रशासकांकडे (District Bank Administrators) निवेदनाव्दारे (memorandum) केली आहे. जिल्हा बँकेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 (Maharashtra Co-operative Societies Act 1960) चे कलम 88 अन्वये चौकशी करून 31 डिसेंबर 2021 रोजी चौकशी अहवाल सादर केला.

या अहवालात बँकेचे संबंधीत संचालक व अधिकारी यांनी संगनमत करून 20 कर्ज प्रकरणांमध्ये मनमानी करून बेकायदेशीरपणे,, कर्ज धोरणां विरूध्द जाऊन व संस्थेच्या पोटनियमांचे बाहेर जाऊन तब्बल 348 कोटी रूपयांचे कर्जे मंजूर करून वितरीत केली आहेत. बेकायदेशीरपणे वाटप केलेली ही कर्जे शंभर टक्के एनपीए झालेली आहे.

ती कर्जे वसुली होण्याची सुतराम शक्यता नाही. याबाबतचा खुलासा अहवालात (पान 86 व 87 वर) झालेला आहे. फेरतपासणी अहवालात देखील ही बाब नमूद करण्यात आलेली आहे. या अहवालाच्या आधारे बँकेच्या आजी-माजी संचालक, अधिकाजयांविरोधात कारवाई सुरू केल्यानंतर, लागलीच माजी संचालकांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil) यांच्याकडे धाव घेतली. यात त्यांनी कारवाईस स्थगितीची मागणी केली. त्यानुसार सहकारमंत्री पाटील यांनी या कारवाईस स्थगिती दिली आहे.

संबंधित 20 प्रकरणांमध्ये बँकेचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हा बँक प्रशासनाने या स्थगिती विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर भाऊसाहेब गडाख, दीपक मोगल, पंढरीनाथ काकड, भगवान चौधरी, सुरेश कातकाडे, माधवराव जाधव, बाजीराव भामरे, रामभाऊ गावले, भिकाजी शिंदे, दत्तात्रय भोर, सुभाष काकड, रामनाथ गिते, प्रभाकर वाघमारे, एल. जी. ठाकरे, एस. बी. आहेर, रामनाथ काळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com