
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar
महाराष्ट्र शासनाने आगामी त्रंबकेश्वरचा 2027 चा कुंभमेळा ( Trimbakeshwar Kumbhmela-2027)लक्षात घेऊन स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करावे अशी जोरदार मागणी त्रंबकेश्वर येथील आखाडे साधू महंत यांच्या आखाडा परिषदेने (Aakhada Parishad )शासनाकडे केली आहे.
खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse )यांनी त्रंबकेश्वरला येत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरी गिरीजी महाराज (Hari Giriji Maharaj )यांची येथील निल पर्वतावर भेट घेतली. यावेळी हरीगिरी महाराजांनी वरील मागणी केली.
श्री पंच दशनाम जुना आखाडायचे साधू यावेळी उपस्थित होते. यात सभापती उमा शंकर भारती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे त्रंबकेश्वर चे प्रमुख पदाधिकारी, पुरोहित संघाचे प्रतिनिधी ,मंदिराचे विश्वस्त यावेळी उपस्थित होते.
सर्वच कुंभमेळा क्षेत्रासाठी प्राधिकरण असते तसेच त्रंबकेश्वर साठी व्हावे. सर्वच कुंभमेळाक्षेत्रे रेल्वेने जोडले गेलेले आहेत त्रंबकेश्वर याला अपवाद आहे तेव्हा त्रंबकेश्वर रेल्वेने जोडता यावे यासाठी प्रामुख्याने डहाणू त्रंबकेश्वर अथवा कसारा त्रंबकेश्वर रेल्वेने जोडावे.
त्रंबकेश्वरच्या हा अहिल्या गोदा संगम घाटात कायमस्वरूपी वर्षभर पाणी वाहते राहील अशी योजना आखावी. त्र्यंबकेश्वरला चारही बाजूने जोडणारा रिंग रोड करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.पुरोहित संघाचे मनोज थेटे,त्रिविक्रम जोशी, लक्ष्मीकांत थेटे, विश्वस्त भूषण आडसरे माजी नगराध्यक्ष सुरेश गंगापुत्र,माजी नगरसेवक गोविंद मुळे यावेळी उपस्थित होते. एकंदरीत वरील मागण्यांना गाव स्तरावर पाठिंबा मिळत आहे. नगरसेवकांनीही अशीच मागणी केली आहे. राज्य शासनाने केंद्राचा दरवाजाही यासाठी ठोठावाअशी मागणी उपस्थितांनी केली
शासनाकडे वरील मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन खासदार हेमंत गोडसे यांनी दिले आहे.