ईदगाह मैदानावर मंडप उभारण्याची मागणी

शिवसेना नेते मुशीर सय्यद यांची आयुक्तांकडे मागणी
ईदगाह मैदानावर मंडप उभारण्याची मागणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान ( Ramjan Month )महिन्याचे आज 17 रोजे पूर्ण झाले असून येत्या 3 मे रोजी पवित्र रमजान ईदच्या मोठा सण ( Ramjan Eid Festival ) मुस्लिम बांधव साजरी करणार आहेत.

दोन वर्षांच्या कालखंडानंतर शाहजानी ईदगाह मैदानावर ईदची सामुदायिक नमाज पठण होणार आहे.

या निमित्त ईदगाह मैदानावर ( Eidgah Ground )महापालिकेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सुविधा पुरवण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा शिवसेना नेते मुशीर सय्यद (Former corporator and Shiv Sena leader Mushir Sayyd ) यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.

येत्या 3 मे रोजी मुस्लीम धर्मियांचे सर्वात मोठे सण रमजान ईद येत असून ईद निमित्त मुस्लीम समाज मोठया प्रमाणावर नाशिक येथील शाहजानी ईदगाह मैदान (गोल्फ क्लब] येथे नमाज पठणास येत असतात.

या ठिकाणी दरवर्षी नाशिक महानगर पालिकेतर्फे ईदगाह मैदानाचे सपाटीकरण करुन साफसफाई केली जाते. व वजु करण्यासाठी तात्पुरते वजु खाने (पाण्याचा नळ) ची व्यवस्था केली जाते.

यंदाची रमजान ईद भर उन्हाळयात ( Summer Season )येत असल्याने या ठिकाणी सुमारे 20 हजार फुट मांडव मनपा तर्फे उभारण्यात यावा (शॉर्ट टेंडर नोटीसद्वारे] व ईदगाह मैदान सपाटीकरण करण्यात यावे, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.

मागील दोन वर्षा पासून करोनामुळे याठिकाणी ईदची नमाज झाली नाही, यामुळे ठिकाणी मोठे खड्डे झाले असून त्वरीत ईदगाह मैदानाचे सपाटीकरण करुन व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.