'दुरांतो'चे स्वातंत्र्यवीर सावरकर एक्सप्रेस नामकरण करा

'दुरांतो'चे स्वातंत्र्यवीर सावरकर एक्सप्रेस नामकरण करा
file photo

येवला | प्रतिनिधी

मुंबई हावडा दुरांतो एक्सप्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकर दुरांतो एक्सप्रेस असे नाव देण्यात यावे, अशी मागणी येथील येथील भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल निवेदनाद्वारे केली आहे...

त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पाठविलेल्या निवेदनात महटले आहे की, मुंबई हावडा दुरांतो एक्सप्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकर दुरांतो एक्सप्रेस असे नाव देण्यात यावे.

कारण याला ऐतिहासिक संदर्भ असा आहे की, १९२१ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमान कारागृहातून सुटका झाल्यावर त्यांना कलकत्त्यात ब्रिटिश सरकारने आणुन सोडले होते. मग कलकत्त्याहुन ते महाराष्ट्रात आले.

तसेही महाराष्ट्र व बंगाल हे स्वातंत्र्य चळवळीत नेहमीच आघाडीवर होते. २०२१ मध्ये त्या घटनेला १०० वर्षे पुर्ण होत आहे. त्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी नाशिक जवळील भगूर आहे व नाशिकरोड रेल्वे स्टेशन पण मेनलाईनवर आहे. त्यादृष्टीने ही मागणी आपण मान्य केली तर ती समयोचित ठरेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेने २०१६ मध्ये सुरु केली. त्या राजधानी एक्सप्रेसला वीर सेनापती तात्या टोपे राजधानी एक्सप्रेस असे नामकरण करावे, याला ऐतिहासिक संदर्भ असा आहे की, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ब्रिटिश राजसत्तेविरोधात पहिली सशस्त्र क्रांती १८५७ ला झाली.

तीचे नेतृत्व वीर सेनापती तात्या टोपे यांनी केले होते. त्या क्रांतीचा केंद्रबिंदु उत्तर प्रदेशातील मीरत, झाशी व ग्वाल्हेर ही शहरे होती. पैकी झाशी व ग्वाल्हेर ही रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर आहेत. तात्या टोपे यांचा जन्म येवला येथे झाला. ती सशस्त्र क्रांती इतिहासात अजरामर झाली आहे. येवला ही वीर सेनापती तात्या टोपे यांची जन्मभूमी असल्यामुळे येवला रेल्वे स्थानकाचे नामांतर करुन वीर तात्या टोपे रेल्वे स्थानक करावे.

येवले रेल्वे स्थानकात फक्त कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसला थांबा आहे. येवल्यात जगप्रसिद्ध पैठणीचे उत्पादन होते. देश विदेशातील लोक व व्यापारी पैठणी खरेदीसाठी येथे येतात. तसेच कांदा व मका खरेदीची मोठी बाजारपेठ आहे. व्यापारी वर्गाची व येवल्यात पैठणी खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांची गरज लक्षात घेता आपण पुणे जम्मू तावी झेलम एक्सप्रेसला व पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेसला येवला स्टेशनला थांबा दिला तर खुप मोठी गैरसोय दुर होईल, असेही कुलकर्णी यांनी निवेदनात म्हंटले आहे.

पूर्वीपासून कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसला सोलापूर बोगी असायची पण अलीकडे ती बोगी जोडली जात नाही. त्यामुळे जाणार्‍या व येणार्‍या प्रवाश्यांचे खुप हाल होत आहे. या बोगीचे आरक्षण नेहमीच फुल्ल असते ती बोगी पूर्ववत जोडण्यात यावी, अशी विनंतीही कुलकर्णी यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com