प्रहारकडून ठिय्या आंदोलन

सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी
प्रहारकडून ठिय्या आंदोलन

सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

सिन्नर तालुका (sinnar taluka) दुष्काळी जाहिर करावा यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janashakti Paksha) तालुकाध्यक्ष शरद शिंदे (sharad shide) यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पांगरी येथील संत हरीबाबा मंदिराजवळ ठिय्या आंदोलन (Movement) केले. यावेळी मागण्यांचे निवेदन पोलिस उपनिरिक्षक सागर कोते यांना देण्यात आले.

सिन्नर तालुका (sinnar taluka) दुष्काळी (Drought) जाहीर करा, शेतकर्‍यांची (farmers) कर्ज वसुली (Debt recovery) व वीज वसुली थांबवा, पूर्व भागातील रस्ते दुरुस्त करा, पांगरी येथील उड्डाणपुलामुळे उध्वस्त झालेल्या व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन द्या यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे (corona) शेतकरी, दुकानदार, व्यावसायिक, नोकरदार व गोरगरिबांचे उत्पन्न बंद होते.

त्यात यंदा पुरेसा पाऊस पडलेला नाही. नदी, नाले, विहीर कोरडेठाक आहेत. खरीप हंगाम वाया गेला आहे. पुढील रब्बीचा हंगाम (Rabbi's season) धोक्यात आहे. शेतकरी, दुकानदार, व्यवसायिक यांच्या हाती उत्पन्न नसल्याने हाल होत आहेत. तरीही बँक, पतसंस्था, फायनान्स व वीज मंडळाने वसुलीसाठी जप्तीचा धडाका लावला आहे. घराची, शेतीपंपाची, पाणी पुरवठा योजनेची वीज तोडली जात आहे.

तालुक्यातील जनतेवर हा अन्याय असून शासनाने त्वरित कर्ज वसुली, जप्ती व वीज तोड मोहीम थांबवावी. तसेच शहा-वावी रोड, वावी-नांदुर-शिंगोटे रोड, हरसुल फाटा ते कोनांबे रोड, बारागाव पिंपरी ते सुळेवाडी रोड यांची त्वरीत दुरुस्ती करावी, पांगरी गावातून उड्डाणपूलामुळे व्यवसायिक उध्वस्त झाले आहेत. त्यांना पांगरी गावात उदरनिर्वाहासाठी पर्यायी जागा देण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी पंचायत समिती सदस्य रविंद्र पगार, सुनिल महाराज, दिपक पगार, शिवाजी गुंजाळ, सुरेश सानप, संदिप वारुळे, गोकुळ पांगारकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com