एमआयडीसीच्या आरक्षित जागेवर ट्रक-टर्मिनल उभारा

एमआयडीसीच्या आरक्षित जागेवर ट्रक-टर्मिनल उभारा

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

माळेगाव औद्योगिक वसाहतीत (Malegaon Industrial Area) ट्रक टर्मिनलसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. त्यासाठी वसाहतीत सुमारे चार एकरांचा भूखंड राखीव ठेवण्यात आला होता...

आता मात्र हाच भूखंडच विकण्याचा घाट घातला जात असल्याने ट्रक-टर्मिनलचा (Truck-terminal) विषय मागे पडतो की काय? अशी शंका उद्योजकांना सतावत आहे.

वसाहतीत तातडीने ट्रक टर्मिनल उभारण्यात यावे, अशी मागणी सिन्नरच्या उद्योजकांनी (Entrepreneur) एमआयडीसी (MIDC) प्रादेशिक अधिकार्‍यांकडे केली आहे.

सिन्नर औद्यागिक वसाहतीतील (Sinnar Industrial Area) माळेगाव भागात गेल्या पाच वर्षांपासून हा भूखंड आरक्षित असतानाही कोणतरच विकास केलेला नाही ट्रक टर्मिनस अभावी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत.

त्या काही कामगारांना अपंगत्वही आलेले आहे. हा भूखंड विकसित करण्यासाठी माळेगाव ग्रामपंचायतीनेही प्रस्ताव एमआयडीसीकडे सादर केलेला आहे. पण त्यावरही कोणतीच कार्यवाही झालेली नसल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली.

उलट भूखंड विकण्याबाबतची चर्चा समोर येऊ लागल्याने ट्रक टर्मिनलचा विषय मागे सारला जात असल्याची शक्यता अधिक जाणवत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे होते. माळेगाव एमआयडीसीमध्ये (Malegoan MIDC) केएसबी पंप्स लि., जिंदाल सॉ. लि., भगवती स्टील लि. अशा मोठ्या कंपन्यांचे जाळे आहे.

या उद्योगांमध्ये येणारा माल व तयार उत्पादने यांच्या वाहतूकीमुळे (Transportation) वाहनांची मोठी वर्दळ राहत असते. वाहनतळाअभावी ही वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये येणारे कामगार, उद्योजक, पूरवठादार व माळेगावातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.

या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील आरक्षित भूखंड तातडीने विकसित करुन त्याठिकाणी वाहनतळ उभारावे, अशी मागणी सिन्नर परिसरातील उद्योजक आशिष नहार (Ashish Nahar), रतन पडवळ (Ratan Padwal), राजेश गडाख (Rajesh Gadakh), अजय बाहेती (Ajay Baheti), रवी पाटील (Ravi Patil), सुधाकर देशमुख (Sudhakar Deshmukh), किरण वाजे (Kiran Waje), पंकज निकम (Pankaj Nikam), प्रवीण वाबळ (Praveen Wabal) आदींनी निवेदनाद्वारे केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com