काझी गढीला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी

काझी गढीला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अत्यंत धोकादायक झालेल्या काझी गढीला ( Kazi Gadhi )प्रशासनाने त्वरित गॅब्रीयल वॉल किंवा रिटेनिंग वॉलची संरक्षण भिंत बांधावी (protective wall )अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस गटनेते तथा स्थानिक नगरसेवक शाहू खैरे (Corporator Shahu Khaire )यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव ( Municipal Commissioner Kailas Jadhav )यांची भेट घेऊन याबाबत त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नाशिक महानगरपालिका प्रभाग क्र. 13 मधील काझीगढी येथील वसाहत अत्यंत धोकादायक स्थितीत असून सद्यस्थितीत पावसाळा असल्याने कोणत्याही क्षणी तेथे दुर्घटना घडून मोठया प्रमाणावर जिवीत हानी होण्याची दाट शक्यता आहे.

यापूर्वी तेथे रहिवास करणा-या नागरीकांना दोन वेळेस इतरत्र स्थलातरीत करण्यात आलेले आहे. तर नागरीकांना पर्यायी जागा महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिल्याचे मिळकत विभागाच्या रेकॉर्डला उपलब्ध आहे, तरी तेथे मोठ्या प्रमाणात जुने व नवीन घरे तशीच आहे.

याबाबत सखोल चौकशी व्हावी, तसेच काझीगढी बाबत कायमस्वरुपी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी त्या ठिकाणी गॅब्रीयल बॉल किंवा रिटेनिंग वॉल करणे शिवाय पर्याय नाही. अन्यथा मोठया प्रमाणावर जिवीत हानी होण्याची शक्यता खैरे यांनी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com