सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सातपूर पोलीस ठाणे सर्कल ते समृद्ध चौकापर्यंत उड्डाणपूल बांधण्याकरता आ. सीमा हिरे यांनी मनपा आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापती यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील त्र्यंबकरोडवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा रस्ता त्र्यंबकेश्वरकडे जातो तसेच सातपूर व अंबड एमआयडीसी ही मोठी औद्योगिक वसाहत असल्याने अवजड वाहतूक तसेच शहरी वाहतूक या मार्गावरून मोठ्या प्रमाणात होत असल्याने सातपूर पोलीस ठाणे सर्कल ते पपया नर्सरीपर्यंत सातत्याने अपघात होतात. तसेच या मार्गावर मोठी नागरी वस्ती असलेले सातपूर गाव असून पुढे पपया नर्सरीवरून अंबड लिंकरोड, अंबड औद्योगिक वसाहतीकडे जाणारा मार्ग व अशोकनगर सातपूर कॉलनीकडे जाणारा मार्ग आहे. तर सकाळ सर्कलपासून खुटवडनगर व सातपूर एमआयडीसीमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आहे.

या मार्गावर चोवीस तास वाहतुकीची वर्दळ असते. परिणामी औद्योगिक वसाहत व नागरी वसाहतीकडे जाणार्या वाहनांचे प्रमाण जास्त असल्याने वाहतुकीची कोंडी होते. नाशिक शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी सकाळ सर्कल ते समृद्धनगर चौकापर्यंत उड्डाणपूल बांधल्यास वाहतुकीची कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होऊ शकेल.त्यादृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर उड्डाणपुलाची निर्मिती होण्याकरता महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करून सदरचा पूल तातडीने बांधण्यात यावा, असेे निवेदनात नमूद केले आहे.