उड्डाणपूल बांधण्याची मागणी
नाशिक

उड्डाणपूल बांधण्याची मागणी

वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी खा.गोडसे यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी

Abhay Puntambekar

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

शहरात रोज सायंकाळी सिटीसेंटर मॉल ते नवीन नाशिक या दरम्यान होणाऱ्या वाहतुक कोंडीची खा. हेंमत गोडसे यांनी दखल घेतली घेत या दरम्यान उड्डाणपूल व्हावा आणि सदर उड्डाणपुलाच्या कामासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी खा. गोडसे यांनी नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली .

यावेळी खासदार गोडसे यांनी उड्डाणपुल पुलाचे महत्त्व ना. शिंदे यांच्यासमोर मांडले. उड्डाणपूलाच्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही ना. शिंदे यांनी खा. गोडसे यांना दिली.

शहरातील मुख्य रहदारीचा रोड असलेल्या त्रिमुर्ती चौक या परिसरात पेठे हायस्कूल, मनपा रायगड चौक शाळा याशिवाय अन्य शाळा आहेत. याभागात दिवसभर ३ ते ४ हजार शालेय विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या वाहनाची वर्दळ असते. तसेच भाजीबाजार असल्याने येथे ग्राहकांसह विक्रेत्यांची देखील गर्दी होत असते. औद्योगिक वसाहतीकडे येणाऱ्या जाणाऱ्या कामगारांसह कारखानदारांची नेहमीच वर्दळ असल्यामुळे येथे मोठ्याप्रमाणात वाहन कोंडीची समस्या उद्‌भवत असते.

या भागातील रस्त्यावर अनेकदा छोटे – मोठे अपघात झाल्याने अनेकांना आयुष्यभराचे अपंगत्त्व आले असून काहींनी आपले प्राण देखील गमावले आहेत. याविषयीच्या आलेल्या अनेक तक्रारींची दखल खा. गोडसे यांनी घेत सिटीसेंटर मॉल ते नवीन नाशिक या दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी गोडसे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आज खा. गोडसे यांनी मंत्रालयात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी खा. गोडसे यांनी या उड्डाणपुलाचे महत्त्व ना. शिंदे यांच्यासमोर मांडले. खासदार गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने सदर उड्डाणपूल बांधणीकामी आणि त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याकामी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही यावेळी ना. शिंदे यांनी खासदार गोडसे यांना दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com