घोटी । जाकीरशेख Ghoti

इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसात अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यापासुन रोज खराब वातावरण व अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात बागायती व रब्बी शेतपिकांचे तसेच जनावरांच्या चाऱ्यानंचे नुकसान झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील सध्या बागायती व रब्बी पिकांची शेतीची लागवड तसेच लागवडीपूर्व मशागतीची कामे सुरू आहे. टोमॅटो, काकडी, दोडके आदी फळभाज्यांचे उत्पादन सुरू असून बदलते वातावरण व अवकाळी पाऊस या पिकांना धोकादायक ठरत आहे. तसेच अवकाळी पावसाने जनावरांच्या चाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऊन, पाऊस आणि थंडीचा खेळ सुरू असुन हिवाळा म्हटला तर रब्बीसाठी पोषक ठरला जातो. मात्र अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण व पावसामुळे रब्बी पिकांची वाट लावली आहे. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व वातावरणातील बदल यामुळे शेतीपिकांना मोठया प्रमाणात फटका बसला आहे.

भाजीपाला पिकवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून कधी भाव मिळतो तर कधी मिळत नाही अशी परिस्थितीत झाली आहे. दरम्यान शासनाने दखल अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलाची दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना साहाय्य करून दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार मेंगाळ यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.