Video : पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली रद्द करा अन्यथा...; स्वाभिमानीचा इशारा

Video : पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली रद्द करा अन्यथा...; स्वाभिमानीचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांची बदली रद्द करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले....

नाशिकचे पोलीस अधिक्षक म्हणून सचिन पाटील या यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर पाऊले उचलली.

त्यातून काही मंडळींचे हितसंबंध टोकाचे दुःखावले गेल्याने त्यांच्या बदलीचे षडयंत्र यशस्वीपणे राबवून ते अंमलातही आणले गेले. सचिन पाटील आणि प्रताप दिघावकर यांनी शेतकऱ्यांचे दहा ते २० कोटी रुपये व्यापाऱ्यांनी बुडवलेले पैसे परत मिळवून दिले.

व्यापारी जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांना लुबाडून परराज्यात पळून जात. मात्र सचिन पाटील यांनी अशा व्यापाऱ्यांचा परराज्यातून शोध घेऊन त्यांना पकडण्याचे काम त्यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांचे लुबाडलेले पैसे त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांना मिळवून दिले आहेत.

अवघ्या दहा अकरा महिन्यात सचिन पाटील यांच्यासारखा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी या जिल्ह्यातून कार्यकाल पुर्ण होण्याआधीच बदलून जात असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राहणारा समान्य माणूस तसेच शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे.

सचिन पाटील यांनी बदली तत्काळ थांबवावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना खा. राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकऱ्यांसह आंदोलन करेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com