आरोग्य उपकेंद्रात परिचारिका नियुक्तीची मागणी

आरोग्य उपकेंद्रात परिचारिका नियुक्तीची मागणी
USER

शिरवाडे वणी। वार्ताहर | Shirwade Vani

येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात (Primary Health Sub-Centre) गेल्या दोन वर्षापासून निवासी परिचारिका पद रिक्त (Resident Nurse Vacancy) असून वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) येईपर्यंत रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे परिचारिका नेमणूकीची मागणी होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्दी (cold), ताप (fever), खोकला (Cough), मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue), स्वाईन फ्लू (swine flu), करोना (corona) यासारखे साथीचे आजार लवकर उद्भवतात. यासाठी विविध आजारांवर प्रतिबंधात्मक उपायोजना करणे गरजेचे असते.

गावातील पाणीपुरवठा (water supply) करणार्‍या योजनांच्या विहिरी व बोअरवेल्स च्या जलस्रोत मधून गढूळ, दूषित पाणी (Contaminated water) येत असल्यामुळे यापूर्वीच ग्रामपंचायतीने सदरचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नागरिकांंना कळविले आहे. परंतु सर्वच नागरिकांना शुद्ध पाणी विकत घेऊन परवडत नसल्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पाची (water treatment plant) उभारणी करून गावाला मोफत पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.

पालखेड आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अनेक वर्षापासून येथे उपकेंद्राची उभारणी झालेली आहे. येथील आरोग्य उपकेंद्रात (Health Sub-Centre) करोना काळाच्या मागील कालावधीत स्थानिक रहिवासी परिचारिका नेमणूक झालेली होती. परंतु सुविधांचा अभाव व साथीच्या आजारांच्या क्रमवारीत गावाचे नाव आले होते त्यामुळे येथील परिचारिका बदलून गेल्याचे समजते. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये नवीन परिचारिका (nurse) बदलून येण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. परिणामी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मदतनीस, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यावर जबाबदारी वाढली आहे.

आरोग्य उपकेंद्रात परिचारिका नसल्यामुळे दवाखान्याची देखभाल करण्यासाठी अडचण भासत असून त्यासंदर्भात वैद्यकीय अधिकार्‍यांनाच कधी कधी परिचारिकेची भूमिका घ्यावी लागते. येथे स्थानिक परिचारिका असल्यास औषधे देता येणे शक्य न झाल्यास किमान रुग्णांना वैद्यकीय अधिकारी येईपर्यंत थांबविण्यासाठी सल्ला देऊ शकतील. त्यामुळे येथे परिचारिका नेमणूक करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com