
बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे
नाशिक तालुक्यातील सारुळ ( Sarul ) गावातील शासकीय जागेत गावठाणामध्ये जमुना स्टोन क्रशरने ( Jamuna Stone Crushers ) कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. सदर व्यवसाईकांची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव ढगे यांनी जिल्हाधिकारी डी गंगाधरण तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बेकायदेशीर स्टोन क्रशरच्या केमिकलयुक्त मातीमुळे तसेच गाळामुळे विषारी युक्त केमिकलमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान होईल. धूळ युक्त केमिकल युक्त पाण्यामुळे विषारी वायूमुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल. गावातील जेष्ट नागरिकांना दमा, ब्लड प्रेशर, अस्थमा अशा वेगवेगळ्या आजारांची लागण होऊन मानवी जीवनावर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहे.
गावातील शासकीय जागेत सदर स्टोन क्रशर व्यवसायिक बेकायदेशीर माती स्लज , गाळ केमिकलयुक्त पाणी टाकून शासकीय मालमत्तेचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.
पर्यावरण व सरकारी मालमत्तेचा ऱ्हास शिवाय सरकारी महसुलाचे मोठ्या प्रमाणावर अपहार होत असल्याचे तोंडी तक्रारी स्थानिक प्रशासनाकडे करून देखील प्रशासन डोळेझाक करीत आहे.सदर व्यवसाईकांची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी साहेबराव ढगे यांनी केली आहे.