गोविंदनगरला पोलिस चौकीची मागणी

गोविंदनगरला पोलिस चौकीची मागणी

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

गोविंद नगर Govind Nagar अथवा जॉगिंग पार्क Joging Track Area परिसरात पोलिस चौकी उभारावी Demand of police station या मागणीचे निवेदन मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वपोनी सुनील रोहकले यांना सामाजिक कार्यकर्ते कैलास चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने दिली.

या निवेदनात म्हटले आहे की,गोविंद नगर हा परिसर नाशिक शहरातील मध्यवर्ती भाग व उच्चभ्रू व्यक्ती अधिकारी व व्यवसायिक असा रहिवाशांचा परिसर असून , गोविंद नगर परिसरात चार ते पाच जॉगिंग ट्रॅक उद्याने तसेच शाळा तसेच ठिकठिकाणी मार्केट तसेच अतिशय जास्त प्रमाणात नामांकित हॉस्पिटल आहे.

परिसराच्या चारही बाजूने रस्ते रिंग रोड व हायवे असल्याकारणाने अत्यंत वर्दळीचे ठिकाण झालेले आहे . सिटी सेंटर मॉल पासून ते गोविंद नगर हायवेच्या बोगदया पर्यंत हा शंभर फुटी रोड असल्याने अतिशय वेगाने वाहने चालवत असतात .

मुंबई महामार्गाकडून येणारी वाहने शहरात न जाता सातपूर , गंगापूर , महात्मा नगर या परिसरामध्ये जाण्यासाठी हा रोडचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो . जॉगिंग ट्रॅक मुळे असंख्य वृद्ध महिला व पुरुष फिरण्याकरिता सकाळी - सायंकाळी फेरफटका मारत असतात . तसेच ह्या परिसरा मध्ये शाळा देखील असल्याने महिला वर्ग मोठ्या प्रमाणात शाळेत अथवा क्लासमध्ये मुलांना सोडण्यासाठी ये - जा करत असतात .

हा रिंग रोड ओलांडताना नागरिकांना रोज जीव मुठीत धरावा लागतो. यामुळे या परिसरामध्ये सतत मोठ्या प्रमाणात अपघात घडत असतात . तसेच आजू बाजूच्या जॉगिंग ट्रॅक परिसरामध्ये भुरटे तथा सराईत चोऱ्या करणारे युवक कायम नशेत वावरत असतात . जॉगिंग ट्रॅक परिसरात गैरवर्तन करत असतात .

टवाळखोर मुले अश्लील चाळे करत असतात . त्यामुळे बऱ्याचदा सोनसाखळी चोऱ्या झालेले आहेत . गुन्हेगारी वाढल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत . तरी गोविंदनगर भागात पोलिस चौकी उभारावी अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते कैलास चुंभळे ,सुभाष पवार , अरुण घोरपडे ,नाना जगताप ,सचिन कुलकर्णी , संदीप वाजे , संतोष गणोरे , धीरज काबरा , शुभम गिरासे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com