राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यांना हवाय 'बुस्टर डोस'

राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यांना हवाय 'बुस्टर डोस'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या (Elections) पार्श्वभूमीवर विधानसभेत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवारांची बैठक पक्षाने घेतली...

याच धर्तीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची धुरा सांभाळणारे माजी शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांचीदेखील स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे (Sunil Waje) यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केली आहे.

वाजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागील महिन्यात आपण राज्यातील विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेऊन आढावा घेतला.

राज्यातील तरुण पक्ष स्थापनेपासून आपल्या पक्षाचा कणा राहीला आहे. याची प्रचिती २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या प्रतिकूल काळात अनुभवयास मिळाली. अद्यापही पक्ष स्थापनेच्या १९९९ सालापासून ज्या तरुणांनी आपल्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेच्या युवक शाखेच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष पदावर काम केले.

त्यापैकी काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध पदांवर व विधानसभेत कार्यरत आहे. तर काही पक्षाच्या स्थानिक काही कारणांनी अडगळीत पडले आहे. काही जण प्रवाहाच्या बाहेर फेकले आहे. परंतु त्यांची निष्टा अजूनही पक्षावर आहे.

पक्ष वाढीसाठी काम केलेल्या या तरूणांना पुन्हा प्रवाही करण्यासाठी राज्यातील सर्व माजी शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांची स्वतंत्र बैठक आपल्या उपस्थित आयोजित करावी. यातून माजी पदाधिकाऱ्यांना प्रेरणा व बळ निश्चितच मिळेल. पक्ष बळकटीकरिता त्याचा उपयोग होईल, याची दखल घेऊन बैठक बोलविण्यात यावी, अशी मागणी वाजे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.