डेल्टा प्लसचे अहवाल आठ दिवसांत देण्यासाठी प्रयत्न - डॉ भारती पवार

डेल्टा प्लसचे अहवाल आठ दिवसांत देण्यासाठी प्रयत्न - डॉ भारती पवार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

डेल्टा प्लसच्या रुग्णांचे अहवाल चार महिन्यांनी अहवाल येत आहेत. त्यासाठी जिनोम सिक्वेन्स शोधण्यासाठी मोठा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करून आठ दिवसांत अहवाल कसे देता येतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार (Health and Family welfare minister for state Dr Bharati Pawar) यांनी दिली...

त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत माध्यमांना संबोधित करत होत्या. (Collector Office Review Meeting)

त्या म्हणाल्या, अजूनही दुसरी लाट पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अजूनही सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्या ऑक्सिजनची १३७ मेट्रिक टन इतकी मागणी आहे. १९९ व्हेंटिलेटर दिलेले आहेत.

5 सप्टेंबर पर्यंत शिक्षकांचे लसीकरण पूर्ण व्हावे असे आदेश आहेत. त्याबाबत फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश करून युद्धपातळीवर लसीकरण करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर शिक्षकांचे लसीकरण झाले आहे.

मागच्या काळात 20 लाख लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रात 58 कोटी नागरिकांना दिले आहे. येणाऱ्या काळात लसीकरण वाढविण्यात येईल तसेच औषधोपचार ऑक्सिजन यांचा पुरवठा नियमित केला जाईल.

डॉ पवार म्हणाल्या...

ऑक्सिजन गळतीबाबत

- दुर्दैवी घटना होती

- अचानक तांत्रिक बिघाड झाला

- समिती ने दोषी ठरवल्या आहेत दोन कंपन्या

- दोषींवर आम्ही कारवाई करू

डेंगू चिकन गुणिया बाबत डॉ पवार म्हणाल्या...

- करोना सोबत हे दोन संकट आहेत

- फक्त आढावा घेऊन काम करण्या पेक्षा अधिकाऱ्यांनी स्वतः जाणे आवश्यक आहे

- तात्काळ लक्ष द्या

- या दिवसात हे प्रमाण जास्त वाढत आहे

- कोणत्याही पेशंट बाबत अवाजवी बिले झाले असतील तर आम्ही सूचना दिल्या आहेत

- महापौर आमदार आम्ही लक्ष ठेवून आहोत

- ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांवर कठोर कारवाई करणार

- ज्या पद्धतीने गुन्हा असेल त्यानुसार कारवाई

- केंद्र सरकारने काही प्रमाण निश्चित करून दिले होते

- जिथे तक्रार आले तिथे कारवाई होणारच

नारायण राणे प्रकरण

- हा विषय वैयक्तिक घेतला जातोय

- कायद्याचा वापर करून कारवाई केली

- महिला अत्याचार किंवा शेतकऱ्यांसाठी असे लढले असते तर मला आनंद झाला असता

- भाजपचा विचार असा आहे की संयम ठेवला पाहिजे आणि आम्ही तो ठेवला

- भारताच्या बाबतीत विषय होता तो वैयक्तिक घेऊन कारवाई केली

- आमची कार्यालये फोडणाऱ्यांचे मुख्यमंत्री कौतुक करून प्रोत्साहन देत आहेत

त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे

- वैयक्तिक गोष्टींमुळे लोकशाही धोक्यात आहे हे लोकशाही ला मारक आहे

- सर्वांचे भाषण केले तर त्यात काही न काही सापडेल तर आम्ही मागणी करणार

- आज कोव्हीड मध्ये ऍक्टिव्ह मॅनेजमेंट दिसली असती तर योग्य झालं असत

- आमच्या कार्यालयावर आमच्यावर हल्ले होत असतील आम्ही शांत बसणार नाही

- माझ्या यात्रेत देखील प्रतिसाद चांगला आहे; या मुळे राज्य सरकार असुरक्षित झाले का असा प्रश्न पडला आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com