इगतपुरी
इगतपुरी
नाशिक

थँक्स! रेल्वे...प्रवासी महिलेने प्लॅटफॉर्मवर दिला गोंडस बाळाला जन्म

इगतपुरी स्टेशनवरील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

मुंबई -वाराणसी या विशेष ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात रेल्वे आरोग्य सेवेला यश आले आहे.

अधिक माहिती अशी की, (दि.२६) रोजी रात्री सव्वा तिच्या सुमारास ०१०९३ मुंबई-वाराणसी विशेष ट्रेन इगतपुरीला येणार होती तेव्हा प्रवास करणार्‍या व प्रसवपीडा होणा-या प्रियांका नावाच्या गर्भवती महिलेला मदत करण्यासाठी इगतपुरीचे उप स्टेशन मॅनेजर श्री अवधेश कुमार यांनी तातडीने मदतीसाठी इगतपुरी येथील रेल्वे आरोग्य केंद्राला माहिती दिली.

डॉ. ज्योत्सना, अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पथक रूग्णाच्या वैद्यकीय सहाय्यासाठी धावून आल्या व त्यांनी महिलेला इगतपुरी येथेच उतरण्याचा सल्ला दिला.

प्रसूति वेदना होत असलेल्या प्रियांकाने रेल्वे मेडिकल टीमच्या सहाय्याने स्थानकावरच निरोगी बाळाला जन्म दिला. नवजात बाळ आणि महिलेला प्रसूतीपश्चात उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय, इगतपुरी येथे ॲम्बुलन्सने पाठविण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com