
नाशिक । Nashik
ग्रेटर बॉम्बे असोसिएशनतर्फे (Greater Bombay Association) आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत (Dr. Homi Bhabha Pediatric Competition) शहरातील दिल्ली पब्लिक स्कूल (Delhi Public School) मध्ये शिकणार्या तीन विद्यार्थ्यांनी यश पटकावले आहे...
ही स्पर्धा सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. लेखी व प्रात्यक्षिक चाचणी झाल्यानंतर निवड प्रक्रिया, सामान्य मुलाखत, कृती संशोधन प्रकल्पाचे मूल्यमापन, कृषी संशोधन प्रकल्पावरील मुलाखत अशा टप्प्यांतून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य पदकांनी (Gold & silver medals) सन्मानित केले जाते. तसेच शिष्यवृत्तीसाठीही (scholarship) निवड केली जाते. ही निवड पहिल्या टप्प्याच्या ३० टक्के आणि उर्वरित ३ टप्प्यांमध्ये मिळालेल्या गुणांवरुन निर्धारित केली जाते.
दरम्यान, या स्पर्धेमध्ये सहावीतील ऋषिकेश सचिन पाटील व शांभवी कुलकर्णी यांना सुवर्णपदक, प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती, तर नववीच्या मानस दुशिंग याला रौप्यपदक, प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती मिळाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे संचालक सिद्धार्थ राजघरिया, प्राचार्या डॉ. पुष्पी दत्त यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.