दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी २.६ टीएमसी पाणी आरक्षित; असा आहे प्रस्ताव

दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी २.६ टीएमसी पाणी आरक्षित; असा आहे प्रस्ताव

नाशिक | प्रतिनिधी

दिल्ली-मुंबई कॉरिडॉर यापूर्वी पाणी उपलब्ध नसल्याने प्रकल्प स्थगित करण्यात आला होता. जलसंपदा विभागाच्या प्रशासनाने प्रस्तावित अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्पातून कॉरिडाँरसाठी पाणी आरक्षित ठेवावे यासाठी खासदार हेंमत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले...

दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी २.६ टीएमसी पाणी आरक्षित; असा आहे प्रस्ताव
दिल्ली-मुंबई इन्डस्ट्रीअल कॉरिडॉरसाठी पाणी आरक्षित ठेवा

नव्याने प्रस्तावित असलेल्या अप्पर-वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्पामुळे जिल्ह्याला अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे पत्र जलसंपदा विभागाने महाराष्ट्र ओैद्योगिक विकास महामंडळाला दिले आहे.

या नदीजोड प्रकल्पाच्या पाण्यातून २.६ टीएमसी पाणी मुंबई-दिल्ली कॉरिडाँर प्रकल्पासाठी आरक्षित केल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. दिल्ली-मुंबई कॉरिडाँरसाठी पाणी आरक्षित केल्याने हा प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार आहे.

राज्यातील औरंगाबाद आणि नाशिक येथे दिल्ली-मुंबई कॉरिडाँर करण्याचा निर्णय गेल्या चार वर्षापूर्वी तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई कॉरिडाँरचे काम पुर्णत्वाच्या दिशेने आहे.

मात्र प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध नसल्याने नाशिक जिल्ह्यात दिल्ली-मुंबई कॉरिडाँर प्रकल्प होवू शकला नाही. पाण्याअभावी हा प्रकल्प स्थगित करण्यात आला होता. दिल्ली-मुंबई कॉरिडाँरमुळे नाशिक जिल्ह्याचा विकास होणार असल्याने खा. गोडसे यांनी प्रकल्पासाठी पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न सुरु केले होते. दरम्यान प्रस्तावित अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्प या प्रकल्पातून दिल्ली-मुंबई कॉरिडाँर २.६ टीएमसी पाणी आरक्षित करावे, यासाठी खा. गोडसे यांनी शासनाकडे सततचा पाठपुरावा केला होता.

दिल्ली-मुंबई कॉरिडाँर पाणी आरक्षित असावे यासाठी नुकतीच खा. गोडसे यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यालयात विशेष बैठक बोलविली होती. या बैठकीत खा. गोडसे यांनी नाशिक जिल्ह्यांच्या विकासासाठी दिल्ली-मुंबई कॉरिडाँरचे महत्त्व आणि त्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेची गरज याविषयीचे महत्त्व पटवून दिले होते.

खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने दिल्ली-मुंबई कॉरिडोअर प्रकल्पासाठी प्रस्तावित अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्प या प्रकल्पातून २.६ टीएमसी पाणी आरक्षित करण्याचे जलसंपदा विभाग प्रशासनाने मान्य केले आहे.

याविषयीचे पत्र जलसंपदा विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाला नुकतेच दिले आहे. दिल्ली-मुंबई कॉरिडोअर पाणी आरक्षित झाल्याने हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com