पदवी प्रमाणपत्र कधी मिळणार, परदेशातील प्रवेश रखडले !

पदवी प्रमाणपत्र कधी मिळणार, परदेशातील प्रवेश रखडले !
पदवी परीक्षा


नाशिक | Nashik
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१९-२० अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात पदवी प्रदान समारंभ घेण्याचे नियोजन केले होते.

मात्र, लॉकडाउनमुळे नियोजन बिघडले असले तरी मे महिन्याचा अर्धा महिना संपला तरी विद्यापीठाने पदवीप्रदान कधी करणार हे स्पष्ट केलेले नाही. नोकरी तसेच परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रवेश प्रमाणपत्राअभावी लटकले आहेत.


करोनामुळे पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या होत्या. त्या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात आला. विद्यापीठाकडून निकाल लावण्याची प्रक्रिया सुरू असताना ज्या विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर यासह अन्य अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी सुरू केली.

त्यासाठी आवश्‍यक असलेल्या प्रवेश परीक्षा देऊन, त्यात उत्तीर्ण होऊन गुणपत्रिकेच्या आधारे प्रवेश निश्‍चीत केला आहे.अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यापीठाने डिसेंबर महिन्यात पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यास सुरवात केली होती.

पण विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका उपलब्ध झाल्याशिवाय अर्ज भरता येत नसल्याने ३१ जानेवारीपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. विद्यापीठाकडे १ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष कार्यक्रम घेऊन पदवी प्रदान करणे शक्य नाही, त्यामुळे यंदाही विद्यापीठाला ऑनलाइन कार्यक्रमच घ्यावा लागू शकताे. अर्ज भरून घेताना मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदवी समारंभ होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com