दिंडोरीत पुन्हा सदोष मतदार याद्या

दिंडोरीत पुन्हा सदोष मतदार याद्या

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी नगरपंचायत निवडणूकीसाठी Dindori Nagarpanchayat Election प्रसिध्द केलेल्या मतदार याद्यामध्ये पुन्हा प्रचंड घोळ दिसून येत असून प्रत्येक प्रभागात सदोष मतदार याद्या voters List प्रसिध्द झाल्या आहेत.

त्यामुळे अनेक इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. प्रशासनाचे नियोजन पुर्ण कोलमडले असून मयत व्यक्तींचे deceased persons सुध्दा नाव अद्याप बीएलओ यांनी न वगळल्याने मतदार याद्यामध्ये संख्या वाढलेली दिसत आहे.

दिंडोरी नगरपंचायत निवडणूकीत चुकीच्या पध्दतीने प्रभाग रचना केल्याने दिंडोरी नगरपंचायतीची निवडणूक लाबली आहे. त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर निवडणूक सध्या स्थगित आहे. त्याचबरोबर न्यायालयाचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी यांच्याविरुध्द उच्च न्यायालयात याचिका असल्याचे समजते.

निवडणूक याद्यामध्ये कोणाताही चांगल्या पध्दतीने नियोजन न झाल्याने कोणत्याही प्रभागात कोेणतेही मते दिसून येत आहे. निवडणूक आयोग व प्रशासन यांच्या कोणत्याही सुचनाचे पालन नगरपंचायत मतदान प्रतिनिधींनी केलेले नसून त्यामुळे प्रशासनाचे चिरीमिरीमुळे धकत तर नाही ना? असा संशय दिंडोरी शहरात उपस्थित केला जात आहे.

सदोष मतदार याद्याबाबतही जिल्हाधिकारी व प्रशासनाविरुध्द न्यायालयात दावा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com