सदोष बियाण्यामुळे मका उत्पादकांना फटका; कृषि अधिकार्‍यांकडून पंचनामा

सदोष बियाण्यामुळे मका उत्पादकांना फटका; कृषि अधिकार्‍यांकडून पंचनामा

कंधाणे । वार्ताहर | Kandhane

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) कंधाणे (kandhane) येथील दोन शेतकर्‍यांनी (farmers) एका नामांकित कंपनीच्या मका बियाण्याची (Maize seeds) आपल्या सात एकर क्षेत्रात लागवड केली होती.

मात्र ते बियाणे सदोष (Defective Seed) असल्याने उगवणीनंतर पीक लाल पडले असून संपूर्ण क्षेत्रात मर होत आहे. सदोष मका बियाण्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम (kharif season) वाया गेला असून संबंधित शेतकर्‍यांनी नुकसान भरपाईची मागणी (Demand for compensation) केली आहे.

दरम्यान, कृषी विभागाच्या (Department of Agriculture) अधिकार्‍यांनी संबधित क्षेत्राची पाहाणी करून पंचनामा (panchanama) केला आहे. कंधाणे येथील शेतकरी मधुकर बापू बिरारी व यशवंत बापू बिरारी या दोघा भावांनी आपल्या सात एकर क्षेत्रात सिजेंटा कंपनीचे 6540 या मका वाणाच्या 10 बॅग बियाण्यांची लागवड केली होती. बियाण्याची उगवण झाल्यानंतर संपूर्ण पीक लाल पडले असून पिकाची मर होत असल्याचे संबधित शेतकर्‍यांचे लक्षात येताच त्यांनी याबाबत संबधित दुकानदारास भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. मात्र संबधित कंपनीच्या वरिष्ठांकडून शेतकर्‍यांनाच खडे बोल सुनावण्यात आले.

सदोष बियाण्यामुळे (Defective Seed) आपली फसवणूक (Fraud) झाली असतांना कंपनी प्रशासनाकडून आपल्याच सुनावण्यात येत आल्याने शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे (Department of Agriculture) संबधित कंपनीबाबत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत तालुका तक्रार निवारण समितीतर्फे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे (Sub Divisional Agriculture Officer Dilip Deore),

तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार (Taluka Agriculture Officer Sudhakar Pawar), पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रणय हिरे (Panchayat Samiti Agriculture Officer Pranay Here), कृषी विज्ञान केंद्राचे खेडकर यांनी या भागातील क्षेत्राची पाहाणी केली. लवकारात लवकर अहवाल सादर करून आमच्या स्तरावर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन संबधित शेतकर्‍यांना देण्यात आले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

कृषी अधिकारी कडाडले

आपल्या शेतात लागवड केलेल्या सदोष बियाण्यामुळे संपूर्ण खरीप हंगामच वाया गेला असून आता प्रपंच चालवावा कसा; असा सवाल उपस्थित करत या शेतकर्‍यांनी कृषी अधिकारी व कंपनी प्रतिनिधींसमोर आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. यावर तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी कंपनी प्रतिनिधींना शेतकर्‍यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे सांगितले.

तथापी संबधित कंपनी प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देऊन बळीराजालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करीत असल्याचे पाहून कृषी अधिकारी पवार अचानक कंपनी प्रतिनिधींवर कडाडले व त्यांना खडे बोल सुनावले. ज्या बळीराजांच्या जीवावर लाखोंची उलाढाल करतात, त्यांनाच आरोपी म्हणून पाहातात काय? संबधितांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल; असा दमच त्यांनी भरला. कृषी अधिकार्‍यांच्या या भुमिकेमुळे उपस्थित शेतकर्‍यांनी मात्र समाधान व्यक्त केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com