
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या (Watergrace Company) संचालकांनी अब्रुनुकसानीची नोटीस बजावली असून,
दातीर यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. कंपनीची बदनामी केल्याच्या कारणास्तव मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर (MNS City President Dilip Dater) यांच्याविरूद्ध नोटीस (notice) बजावर्यात आली.
दोन दिवसांपूर्वी वाटरग्रेस कंपनी (Watergrace Company) काळ्या यादीत असल्याचे तसेच कंपनीला ठेका देणारे मनपाचे अधिकारी (Municipality officials) हे ठेकेदाराचे नातेवाईक असल्याचे चुकीचे आरोप मनसेचे शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांनी उपोषण प्रसंगी केले होते.
कंपनीला नियमानुसारच ठेका मिळालेला असून, कंपनीकडून कर्मचार्यांचे ईएसआय (ESI), पीएफ नियमित भरला जात असतानाही दातीर यांनी यासंदर्भात खोटे आरोप केल्याने कंपनीची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे दातीर यांनी येत्या पंधरा दिवसात जाहीर माफी मागावी अन्यथा मानहानीचा गुन्हा (Offense of defamation) दाखल करण्यात येईल असा वॉटरग्रेस कंपनीने नोटिसीत म्हंटले आहे.