रामशेज किल्ल्यावर दीपोत्सव

रामशेज किल्ल्यावर दीपोत्सव

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) व स्वराज्यासाठी कामी आलेल्या लाखो मावळ्यांचे स्मरण व्हावे म्हणून किल्ले रामशेज (Ramshej Fort) येथे किल्ले रामशेज महोत्सव समिती, सकल मराठा परिवार व गडवाट दुर्गसवर्धन समितीच्या माध्यमातून दीपोत्सव (Dipotsav) मोठया उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.

यावेळी गडपूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर किल्ल्यावर हजारो पणत्या, टेम्भे व 21 मशाली पेटवून गड जणू दीपमाळच भासत होता. किल्ल्यावर असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या स्मारकाला फुलांची व दिव्यांची सजावट (Decoration of lights) करून बाल शिवचरित्रकार साक्षी ढगे यांचे रामशेज किल्ल्यावर (Ramshej Fort) व्याख्यान झाले.

यानंतर शिवचरित्रकार नितीन डांगे पाटील यांनी छत्रपती शिवराय व शंभूराजे व थोर क्रांतिकारक यांचा इतिहास आजच्या तरुणाला काय देतो व तरुणाने काय करावे यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले. यावेळी हेंगडे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. किल्ले रामशेज महोत्सव समितीच्या (Fort Ramshej Festival Committee) वतीने निलेश पेलमहाले यांनी रामशेजवर होणार्‍या उपक्रमांची माहिती देऊन गडकोट संवर्धन करणार्‍या मावळ्यांचे आभार मानले.

सकल मराठा परिवराच्या वतीने दत्ता काळे यांनी सूत्रसंचालन केले. सामाजिक कार्याची माहिती दिली. किल्ले महोत्सव समिती, गोपीनाथ गुंड पाटील, निलेश पेलमहाले, जगदिश जाधव, बालाजी ढगे, शरद बोराडे,गणेश खांदवे, गणेश जाधव, मयूर अपसुंदे, रोशन संधान, वैभव बोराडे, अनुराग राजपुरे, संचित अहिराव, अविष्कार अहिराव, स्पंदन जाधव, यशराज गुंड, सुमित खांदवे यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com