तुळजाभवानी मंदिर सभामंडपाचे लोकार्पण

तुळजाभवानी मंदिर सभामंडपाचे लोकार्पण

सातपूर । प्रतिनिधी Satpur

प्रभाग क्रमांक 26 म्हाडा कॉलनी चुंचाळे येथे बांधण्यात आलेल्या श्री तुळजा भवानी मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा घटस्थापनेच्या मुहूर्तावर आ.सीमा हिरे यांच्या हस्ते झाला.

यावेळी नगरसेवक मधुकर जाधव, भागवत आरोटे, नगरसेविका अलकाताई अहिरे, महेश हिरे, बाळासाहेब पाटील, रामहरी संभेराव, कैलास अहिरे, लखन कुमावत, अशोक पारखे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ.हिरे यांनी सांगितले की, मागील पंचवार्षिक काळात मतदार संघात विविध लोकापयोगी विकास कामे मार्गी लागली.

मतदार संघ हा श्रमिकबहुल वर्ग असल्याने या कामगार लोकांनी मला भरभरुन मतदान केले. त्याचे उतराई विविध विकासकामांच्या माध्यमातुन करत आहे. संघातील पेलीकन पार्क, धोकादायक वीजतारा भुमीगत करणे, सातपूर पोलीस स्टेशनला स्वतंत्र इमारतीचे काम लवकरच सुरु होणार आहे.

ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, तरुणांसाठी जिम्नॅशियम हॉल, ग्रीन जीम, अभ्यासिका तसेच स्लम वस्तीतील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन टाकणे, ड्रेनेजची व्यवस्था करणे यासारखी कामे मागील काळात पूर्ण करण्यात आली असुन अजुनही काही कामे प्रगतीपथावर आहे. मतदार संघाच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या नाशिक शाखेच्या फलकाचे अनावरण देखिल मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रभाग 26 हा नव्याने विकसित होणारा भाग आहे या प्रभागात आजपर्यंत जवळपास 3 कोटीची कामे करण्यात आली असुन यापुढेही आवश्यक असेल त्या ठिकाणी निधी निश्चितच उपलब्ध करुन दिला जाईल. आ.हिरे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक भागवत आरोटे, मधुकर जाधव, अलकाताई आहिरे, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रभागातील अण्णासाहेब आहेर महाराज, साठे महाराज, लहु महाराज, संदीप महाराज, महेंद्र पाटील, अशोक पवार, डॉ. सनानसे, चिराग सोनी, युवा मोर्चाचे निलेश भंदुरे भाजपा मंडलाच्या महिला आघाडी अध्यक्ष स्वाती ठाकरे, कमल मेदगे, संजय गुंजाळ, ज्ञानेश्वर बगडे, युवराज बनसोडे यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com