देवस्थान विकासकामांचे लोकार्पण

रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता
देवस्थान विकासकामांचे लोकार्पण

सिन्नर । वार्ताहर Sinnar

येथील गवळीनाथ महाराज (Gavalinath Maharaj), लक्ष्मीआई मंदिर देवस्थान विकासकामांचे लोकार्पण (Dedication of development works) उत्साहात पार पडले. कलशारोहण, प्राणप्रतिष्ठा व कीर्तनकार रामराव महाराज ढोक यांच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

खासदार हेमंत गोडसे (mp hemant godse), माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje), उदय सांगळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देशपांडे, सगर विद्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते नामदेव लोंढे, थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, वडार समाजाचे प्रमुख रामदास धोत्रे यांच्यासह भाविक उपस्थित होते. देवस्थान सेवा समितीचे अध्यक्ष संजय लोणारे यांनी स्वागत केले.

मान्यवरांच्या हस्ते मंदिर सभागृह, सुशोभीकरण (Beautification), ग्रीन जिम (Green Gym) आदी कामांचे लोकार्पण करण्यात आले. गवळीनाथ महाराज व लक्ष्मीआई देवस्थान सेवा समितीच्यावतीने विकास कामांसाठी योगदान देणार्‍या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा धार्मिक विधी (Religious rites) तीन दिवसापासून सुरू होता. रामराव महाराज ढोक यांच्या किर्तन सोहळ्याने धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. देवस्थानशी जुना ऋणानुबंध असल्याने त्याचा विकास व्हावा अशी इच्छा होती, असे मत सांगळे यांनी व्यक्त केले.

माजी खासदार नरेंद्र जाधव (Former MP Narendra Jadhav) यांनी ग्रीन जिम साठी निधी (fund) दिला. खा. गोडसे, माजी आ. वाजे, नगराध्यक्ष डगळे, देशपांडे आदींची मदत लाभली. जिल्हा परिषद व वैयक्तिक पातळीवर मदत करून देवस्थानचा विकास करण्यात आल्याची माहिती सांगळे यांनी दिली. सगर विद्या शिक्षण मंडळाने (Vidya Shikshan Mandal) देवस्थानच्या नावे जागा करुन दिली. त्यांचे यावेळी ऋण व्यक्त करण्यात आले. किरण मिठे यांनी सूत्रसंचालन केले. मनोज महात्मे यांनी आभार मानले. सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिन्नरच्या सौंदर्यात भर

गवळीनाथ महाराज व लक्ष्मीआई देवस्थानचा विकास झाल्याने परिसराला उजाळा मिळाला आहे. आकर्षक मंदिर व समागृह, मोकळे पटांगण, ग्रीन जीम व परिसर सुशोभिकरणामुळे सिन्नरच्या सौंदर्यात भर पडली आहे. यामुळे भाविकांसह ज्येेष्ठ नागरिक व लहान मुलांची याठिकाणी व्यवस्था झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com