सर्जिकल बँकेचे लोकार्पण

सर्जिकल बँकेचे लोकार्पण

सटाणा । प्रतिनिधी Satana

गरजू रुग्णांसाठी आर्थोपेडिक (orthopedic) व सर्जिकल बँक (surgical bank) उभी करून रोटरीने सामाजिक कार्याचा वसा जोपासला असल्याचे प्रतिपादन रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांनी येथे केले.

येथील रोटरी क्लब ऑफ सटाणा (Rotary Club of Santana) मिडटाऊनतर्फे (Midtown) उभारण्यात आलेल्या आर्थोपेडिक व सर्जिकल या अत्याधुनिक बँकेचे लोकार्पण (dedication) शहरातील राजस्थानी मंगल कार्यालयात वेणुगोपाल यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमात माजी आ. संजय चव्हाण, (former mla sanjay chavan) साहित्यायनचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे, समको बँक संचालक यशवंत अमृतकार, रोटरी उपप्रांतपाल दिलीप ठाकरे आदिंनी मनोगत व्यक्त केले.

रोटरीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभिमन्यू पाटील यांनी रोटरीतर्फे शहर व तालुक्यातील गरजू रुग्ण, अपघातग्रस्त व वयोवृद्ध नागरिकांना वापरासाठी व्हीलचेअर (wheelchair), कमोडचेअर (commodechair), हॉस्पिटल कॉट, वॉकर आदी उपकरणे पुरवणार असल्याचे स्पष्ट करीत, उपकरणे वापरून पुन्हा आर्थोपेडीक बँकेकडे परत करावयाची आहेत. या प्रोजेक्टचा अनेक गरजूंना फायदा होणार असल्याचे सांगितले.

बँकेसाठी राजेंद्र राका, विवेक जगताप, संजय नेरकर, नवल पाटील, भरत अमृतकार, अनिल निकम, खंडेराव शेवाळे, राहुल जाधव, संगीता मोरे, योगेश दशपुते आदींचे सहकार्य लाभल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास श्रीधर कोठावदे, विलास शिरोरे, प्रकाश सोनग्रा, ईनरव्हील अध्यक्षा साधना पाटील, रेखा वाघ, रामदास पाटील, अमोल अंधारे, जगदीश मुंडावरे, किशोर कदम, अतुल पाटील, रुपाली कोठावदे, सचिन दशपुते, योगेश अमृतकार, निलेश धोंडगे, विद्या अमृतकार आदींसह नागरिक उपस्थित होते. तुषार महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव प्रकाश सोनग्रा यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com