सिन्नरला सत्तर सॅनिटरी वेडिंग मशीनचे लोकार्पण

तालुक्यातील सत्त्तर गावांना लाभ
सिन्नरला सत्तर सॅनिटरी वेडिंग मशीनचे लोकार्पण

सिन्नर । Sinnar

महिलांना मासिक पाळीत भेडसाविणार्‍या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या सदृढ आरोग्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

सिन्नर तालुक्यात ग्रामपंचायत अंतर्गत सॅनिटरी नॅपकीन मशीन, डिस्पोजेबल मशिन कार्यान्वित करण्याच्या हेतूने जवळपास ७० हून अधिक मशिनचे लोकार्पण सोमवारी (दि.3) खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सिन्नर पंचायत समिती कार्यालयात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सिन्नर येथील येथील क्युपीड कंपनीच्या सीएसआर फंडातून या मशिन उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी कंपनीकडून १२ लाखांचा निधी मंजूर झाल्याने तालुक्यातील ७० पेक्षा जास्त गावांमध्ये हे सॅनिटरी मशीनसह डिस्पोजेबल मशीन बसविण्यात आले आहेत.

सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत वेळोवेळी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

सर्वाधिक आनंद

आमदारकीच्या काळात तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्याचा आपण मनोदय व्यक्त केला होता. मात्र, प्रशासकीय मान्यतेत सदर उपक्रम अडकला होता. शितल सांगळे ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील पाच शाळांना सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्यात आले आहे.

आज खा. हेमंत गोडसे यांच्या पुढाकारातून क्युपीड कंपनीने 12 लाखांच्या निधीतून 70 गावांसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन उपलब्ध करुन दिले आहे. महिलांच्या आरोग्याबाबत असणारा हा खा. गोडसे यांनी तालुक्यात राबविल्याने आपल्याला सर्वाधिक आनंद झाला आहे.

- राजाभाऊ वाजे, माजी आमदार

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com