शालेय इमारतीचे लोकार्पण

शालेय इमारतीचे लोकार्पण

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

महाराष्ट्र शासन समग्र शिक्षा अभियान, एम्पथी फाउंडेशन Empathy Foundation व लोकसहभागातून Through public participation 70 लाख रुपये खर्चून उभ्या राहिलेल्या देवपूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या Devpur- ZP School नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. चेन्नई येथील उद्योजक कमला लूणावत व प्रीती लूणावत यांनी शाळेच्या चाव्या मुख्याध्यापिका अश्विनी वाघ यांच्याकडे सुपूर्द केल्या.

शहरी भागातील शाळांबरोबरच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील शाळाही टिकल्या पाहिजेत. शाळांच्या इमारती प्रशस्त, भव्य-दिव्य असतील तर मुलेही त्यात आनंदाने रमतात. या भावनेतून ग्रामीण भागातील शाळांना इमारती बांधून देण्याचा उपक्रम इम्पथी फाउंडेशनने दहा वर्षांपासून सुरू केला असल्याची माहिती फाऊंडेशनचे विश्वस्त विनोद जैन यांनी दिली. राज्यातील पुणे व नाशिक जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात आला. सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्यात फाउंडेशनने छत्तीस शाळांना सुंदर इमारती बांधून दिल्याची माहिती त्यांनी दिली.

ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचा शब्द लुणावत यांनी दिला. जैन, लुणावत यांच्यासह फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. आर. सुंदरेस्वरण, कलावती जैन, फुलर्तनं हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापक दीपक गडाख यांचा ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्रीयन फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यानंतर टाळ. मृदुंगाच्या गजरात पाहुण्यांची गावातून शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सूत्रसंचलन सचिन कडलग यांनी केल.े

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेव गडाख, पंचायत समिती सदस्य विजय गडाख, माजी सदस्य नवनाथ गडाख, निमाचे माजी संचालक राजेश गडाख, सरपंच अनुराधा गडाख, माजी सरपंच जूगल गवळी, उपसरपंच प्रशांत गडाख, पूंजा खोले, डॉ. संजय गडाख, शिक्षण विस्ताराधिकारी दिलीप पवार, केंद्रप्रमुख मनोहर तांबेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.

खर्‍या अर्थाने आनंदमय शिक्षण

दीडशे वर्षांपूर्वी 1862 मध्ये इंग्रजांनी बांधलेली शाळेची इमारत मोडकळीस आली होती. इमारत धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसवणे अवघड होते. सन 2016 मध्ये ग्रामपंचायतने शाळेच्या नूतन इमारतीसाठी एम्पथी फाउंडेशनकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, शासनासह लोकसहभागाची त्यांनी अट टाकली. त्यामुळे शासनाकडे समग्र शिक्षा अभियानामार्फत प्रस्ताव टाकून पंधरा लाखांचा निधी मिळवला.

ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून तीन लाख दिले. फाऊंडेशनने त्यात 40-42 लाख टाकून टुमदार इमारत उभी केली आहे. पहिली ते चौथीच्या वर्गासाठी चार वर्गखोल्या, एक संगणक कक्ष व मुख्याध्यापकांचा कक्ष उभारण्यात आला असून या नूतन इमारतीत खर्‍या अर्थाने आनंदमय शिक्षण विद्यार्थी घेऊ शकतील असा विश्वास शालेय समिती सदस्य शरद गडाख यांनी व्यक्त केला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com