सिन्नर रुग्णालयातील ऑक्सिजन युनिटचे आज लोकार्पण

सिन्नर रुग्णालयातील ऑक्सिजन युनिटचे आज लोकार्पण

सिन्नर । प्रतिनिधी

खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांतून आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या मदतीने सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिट बसविण्यात आले आहे. आज (दि.12) सकाळी दहा वाजता या स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन युनिट बसवावे यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी खा. गोडसे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची खा. गोडसे यांनी दखल घेवून बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिट बसविण्यात आले आहे. या मशिनचे इनस्टॉलेशनचे काम पूर्ण झाले असून उद्यापासून हे युनिट कार्यान्वित होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजाभाऊ वाजे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना युवानेते उदय सांगळे, सभापती शोभा बर्के, नगराध्यक्ष किरण डगळे, उपसभापती संग्राम कातकाडे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, शहर प्रमुख गौरव घरटे, पिराजी पवार, बांधकाम व्यावसायिक अभय चौकसी, विजय बाविस्कर, भाऊसाहेब सांगळे, बी. टी. कडलग आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदरचे युनिट बडोदा येथील अ‍ॅरो या कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. या युनिटची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता प्रतितास 10 एन.एम.क्यू. इतकी आहे. या युनिटमुळे सुमारे 45 ते 50 रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होणार असून दिवसभरात जवळपास 35 ते 40 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरता येणार आहेत. यामुळे ऑक्सिजनअभावी होणारी रुग्णांची गैरसोय दूर होणार असल्याने सिन्नरसह तालुक्यातील नागकिरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com