देवळालीत प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण

देवळालीत प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

कोविड काळात प्रत्येकाला प्राणवायूची किंमत लक्षात आली आहे. महामारीमध्ये वाईट अनुभव आला असल्याने देवळाली कॅम्पकरांना यापुढे ऑक्सिजनसाठी ( Oxygen )भटकंती करावी लागणार नाही, असे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse) यांनी केले.

येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ( Cantonment Hospital )हंसराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व भालेराव परिवार (Hansraj Charitable Trust Mumbai and Bhalerao Family ) यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.मिलिंद भालेराव यांच्या स्मरणार्थ 30 लाख रुपये खर्चाचा ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आला असून त्याचे लोकार्पण काल कोविडच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मंचावर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. रागेश, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार ,हंसराज चॅरिटेबल ट्रस्टचे पीयूषभाई जसरानी, राजेंद्र सांगळे, माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, संजय भालेराव, डॉ. जयश्री नटेश, अ‍ॅड. राजीव भालेराव, शैलेश भालेराव आदी उपस्थित होते.

यावेळी जसरानी यांनी आपण ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतो. भविष्यातही अशा उपक्रमात सहभागी होऊन मदत करणार असल्याचे सांगितले. ब्रिगेडियर ए. रागेश यांनी गेल्या सात-आठ महिन्यात ऑक्सिजनबाबत सर्वांनी अनुभलेली परिस्थिती पुन्हा येणार नाही याची काळजी घ्यावी, असे सांगितले.

सीईओ अजय कुमार यांनी हॉस्पिटलच्या सर्व स्टाफने तन, मन धनाने काम केले असून तिसर्‍या लाटेसाठी आपण सज्ज असल्याचे नमूद केले. प्लांटच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करणार्‍या संजय भालेराव, अ‍ॅड. राजीव भालेराव, शैलेश भालेराव व त्यांचे कुटुंबियांसह अभियंता विलास पाटील, वसंत शेरमाळे आदींचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन सायमन भंडारे यांनी केले. कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवाडकर, प्रभाकर दोंदे, विवेक बंड, अमन गुप्ता, स्वप्नील श्रोत्रीय, पियुष पाटील आदींसह डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com