प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण

प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण

देवळा । प्रतिनिधी deola

देवळा (deola) ग्रामीण रूग्णालयांसाठी (rural hospital) मंजूर झालेल्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण (Dedication of Oxygen Generation Project) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्राणवायू निर्मिती प्रकल्पामुळे रूग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून लक्ष घालणार असल्याचे आश्वासन ना.डॉ. पवार यांनी यावेळी बोलतांना दिले.

प्राणवायू प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल आहेर (MLA Dr. Rahul Aher) होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे (BJP) जिल्हाध्यक्ष केदा आहेर होते. यावेळी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. पुना गांडाळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तहसिलदार विजय सुर्यवंशी, कृषी अधिकारी सचिन देवरे, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ. गणेश कांबळे, सहाय्यक अधिक्षक विजयसींग पवार रूग्ण कल्याण समिती सदस्य संजय आहेर, जितेंद्र आहेर, महेंद्र पाटील, किशोर चव्हाणआदी मान्यवर उपस्थित होते.

करोनाच्या (corona) दुसर्‍या लाटेत तालुक्यात ऑक्सीजनचा (oxygen) तुटवडा पडल्यामुळे प्रशासनाबरोबरच रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. करोना रूग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सीजन मिळविण्यासाठी दमछाक झाली. ऑक्सीजनची समस्या दूर करण्यासाठी तालुक्यातील काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तिनी पुढे येत करोना केअर सेंटरला भेट दिली ऑक्सीजन मशीनमुळे अनेक रूग्णांचे प्राण वाचले.

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला तोंड देतांना रूणांना ऑक्सीजनचा तुटवडा (Lack of oxygen) पडू नये व ऑक्सीजन त्वरीत उपलब्ध व्हावा या ऊद्देशाने देवळा येथे ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू निर्मिती संच उभारण्यात आले आहेत. हवेतून प्राणवायू जमा करणार्‍या ह्या प्रकल्पात 200 लिटर प्रति मिनिट प्राणवायू निर्मिती होणार असून दररोज 50 ते 60 जम्बो सिलेंडर भरतील इतका प्राणवायू एका प्रकल्पातून मिळणार आहे. प्रकल्पासाठी 52 केव्ही क्षमतेचे रोहित्र उभारण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.